व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणारा व्यापक आयुर्वेद !

आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. आयुर्वेद म्हणजे मानवाचे आयुष्यमान वाढवणारा मूलमंत्र होय. आयुर्वेदात रोगनिवारणासह रोगप्रतिबंधात्मक उपायही सुचवलेले आहेत. आयुर्वेदात व्यक्तीचा सर्वांगाने म्हणजे तिच्या प्रकृतीचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर विचार केला जातो. जीवन निरोगी राखण्यासाठी सदाचार पालनाची जोड असलेली दिनचर्या, ऋतूचर्या, तात्काळ गुण देणारे अग्नीकर्म आणि वेधनचिकित्सा, शरीर आणि मन यांच्या संतुलनासाठी योगासने, आहार-विहार, आध्यात्मिक उपाय (जप, होम, नामस्मरण, मंत्रोच्चारण), स्वदेशी वस्तूंचा वापर, संस्कृती आणि पर्यावरण यांचे रक्षण इत्यादी विषय अंतर्भूत केलेलेे आहेत. एवढी व्यापक दृष्टी असलेली चिकित्सा केवळ अन् आयुर्वेदातच आहे.

– वैद्य सुविनय दामले, सिंधुदुर्ग