तामसिक आणि राजसिक पेयांपेक्षा सात्त्विकता देणारी पेये घ्या !

शेजारी विविध पेयांची चित्रे देऊन त्याचे विश्लेषण केले आहे. ही पेये तामसिक, राजसिक आणि सात्त्विक अशा प्रकारांत मोडतात. पेयांच्या प्रकाराचा परिणाम मानवावर होऊन त्याच्यात नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

वरील चित्रात अल्कोहोल, विनादुधाचा चहा, सॉफ्ट ड्रिंक, विनादुधाची कॉफी, दूध घातलेला चहा, फळांचा रस, नारळपाणी, साधे पाणी, म्हशीचे दूध आणि गायीचे दूध या क्रमानुसार पेये दाखवलेली आहेत.

अल्कोहोल आणि ब्लॅक टी यांसारख्या पेयांत सूक्ष्म-तम घटक जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे मानवावर नकारात्मक परिणाम होऊन त्याच्यातील तामसिकताही वाढते. जितके जास्त प्रमाण, तितका त्या व्यक्तीवर विपरीत परिणाम होतो. सात्त्विक पदार्थ ग्रहण केल्याने व्यक्तीची वृत्ती सात्त्विक होऊ लागते. वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे नारळाचे पाणी ते गायीचे दूध हा क्रम टप्प्याटप्प्याने सात्त्विकतेकडे नेणारा आहे.

अल्कोहोल ते गायीचे दूध हा वरील चित्रात दाखवलेला पेयांचा क्रम असात्त्विक आहारापासून सात्त्विक आहाराकडे जाणारी वाटचाल दर्शवतो. त्यामुळे तामसिक आहाराला बळी न पडता सत्त्वगुण निर्माण करणारे पदार्थ किंवा पेय ग्रहण करावे. सात्त्विकताच मनुष्याला निरोगी जीवनाकडे घेऊन जाते.

कृत्रिम आणि शरिराला हानीकारक ठरणारी शीतपेये !

१. कृत्रिम शीतपेयांमुळे हाडे दुर्बल होणे

कृत्रिम शीतपेयांची ‘पी एच्’ सामान्यतः ३.४ असते. त्यामुळे दात आणि हाडे दुर्बल होतात. मानवी आयुष्याची ३० वर्षे पूर्ण झाल्यानंतर शरिरात हाडांच्या निर्मितीची प्रक्रिया बंद होते. नंतर खाद्यपदार्थांमधील आम्लतेच्या प्रमाणानुसार हाडे दुर्बल होण्यास प्रारंभ होतो.

२. शरिराचे तापमान आणि पेय पदार्थांचे तापमान यांतील विषमतेमुळे व्यक्तीच्या पचनशक्तीवर परिणाम होणे

पेयपदार्थांमध्ये जीवनसत्त्वे किंवा खनिज तत्त्वांचा मागमूसही नसतो. आपल्या शरिराचे सामान्य तापमान ३७ अंश (डिग्री) तापांश (सेल्सिअस) असते, तर एखाद्या शीतपेय पदार्थाचे तापमान शून्य अंश (डिग्री) तापांश (सेल्सिअस) पर्यंत असते. शरिराचे तापमान आणि पेय पदार्थांचे तापमान यांतील विषमता व्यक्तीच्या पचनशक्तीवर विपरीत प्रभाव करते. परिणामी व्यक्तीने खाल्लेल्या भोजनाचे अपचन होते. वायू आणि दुर्गंध निर्माण होऊन दातांमध्ये पसरतो अन् रोग होतात.’

३. प्रयोगातील निष्कर्ष – मजबूत दात हानीकारक पेय पदार्थांच्या प्रभावामुळे विरघळून गेला !

‘एका प्रयोगात तुटलेल्या दाताला पेयाच्या कुपीत ठेवले. १० दिवसांनी तो त्यात विरघळून गेला. मजबूत दातही हानीकारक पेय पदार्थांच्या दुष्प्रभावामुळे विरघळून नष्ट होतात, तर हे पदार्थ पचनासाठी अनेक घंटे जिथे असतात, त्या नाजूक आतड्याचे काय हाल होतील ?’

४. मुलांचा स्वभाव हिंस्र आणि आक्रमक होणे

‘दिवसातून शीतपेयांच्या ४-५ बाटल्या पिणार्‍या मुलांपैकी १५ टक्के मुलांचा स्वभाव हिंस्र आणि आक्रमक होतो !’

(संदर्भ : आधुनिक वैद्य (डॉ.) प्रकाश प्रभू, एम्.डी., हिन्दवी आणि दै. सामना)