दिवसभरात किती आणि कुठल्या वेळी पाणी प्यावे ?
तहान आणि भूक लागणे हे देवाने माणसाला दिलेले वरदान आहे. जेव्हा आपल्याला पाणी आणि अन्न यांची आवश्यकता असते, तेव्हा आपल्याला अनुक्रमे तहान अन् भूक लागते. ‘तहान लागते, त्या वेळी एकाएकी गटागट पाणी न पिता थोडे थोडे पाणी प्यावे’, असे आयुर्वेद सांगतो.