सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव देहली २०२५

‘रॉ’चे माजी अधिकारी कर्नल आर्.एस्.एन्. सिंह यांचे आवाहन – ‘गझवा-ए-हिंद’ला उत्तर म्हणून वैचारिक ‘गझवा-ए-इस्लाम’ला प्रारंभ करा !

भारत मंडपम्, देहली : आपण नेहमी गृहित धरतो की, पाकिस्तान एक भौगोलिक क्षेत्र आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की, पाकिस्तान एक विचार आहे. मुसलमानांचे २ प्रकार आहेत, एक उपखंडीय (सबकॉन्टिनेन्टल) मुसलमान आणि राहिलेले अन्य मुसलमान ! उपखंडीय मुसलमानांपैकी ९९ टक्के मुसलमान नवधर्मांतरित आहेत. गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून ‘गझवा-ए-हिंद’ (भारताच्या इस्लामीकरणासाठी पुकारलेले युद्ध) च्या घोषणा दिल्या जात आहेत. गझवा-ए-ब्रिटन, गझवा-ए-जर्मनी अशा घोषणा कधीच दिल्या जात नाहीत. आपण या धमक्या ऐकून संपून जाणार का ?

आपल्यात प्रतिकार करण्याची क्षमता आहे. त्यामुळेच वैचारिक स्तरावर पहिले ‘गझवा-ए-इस्लाम’ चालू झाले पाहिजे. ‘गझवा-ए-हिंद’ला उत्तर म्हणून वैचारिक ‘गझवा-ए-इस्लाम’ला प्रारंभ करा, असे आवाहन ‘रॉ’ आणि भारतीय सेना यांचे माजी अधिकारी कर्नल आर्.एस्.एन्. सिंह यांनी केले. ते १३ आणि १४ डिसेंबर या कालावधीत देहली येथे होत असलेल्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवातील ‘रणसंवाद – भारताचे सामरिक धोरण’ या परिसंवादात बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर ब्रिगेडियर (निवृत्त) संजय अग्रवाल, विंग कमांडर (निवृत्त) विनायक डावरे, ‘नॅशनल सेंटर फॉर हिस्टोरिकल रिसर्च अँड कम्पॅरिटिव्ह स्टडीज’चे अध्यक्ष श्री. नीरज अत्री, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, ‘डीडी न्यूज’चे संपादक अशोक श्रीवास्तव आणि ‘यूथ फॉर पनून काश्मीर’चे अध्यक्ष श्री. राहुल कौल आदी मान्यवर उपस्थित होते. सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी या रणसंवादाचे संचालन केले.
या वेळी ‘पाकिस्तान, चीन आणि तुर्कस्तान यांच्याविषयीचे भारताचे धोरण’ या विषयावर विचार मांडतांना कर्नल आर्.एस्.एन्. सिंह यांनी देशांतर्गत मोठ्या धोक्याची जाणीव करून दिली. ते म्हणाले, ‘‘आपल्या देशांतर्गतही एक पाकिस्तान आहे. प्रत्यक्ष पाकिस्तानात आपण ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवू शकतो; पण देशांतर्गत पाकिस्तानचे काय करणार ? या कट्टरतावादाचा सामना करण्याची आपली क्षमता आहे. त्यांचे विचार आणि आदर्शवाद यांच्यापासून आपल्याला धोका आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर आपण कुंपण घातले आहे. पाकिस्तान्यांना त्याची आवश्यकता वाटली नाही; कारण त्यांना आपल्या आपल्या विचारांपासून धोका नाही. आता देहलीच्या रामलीला मैदानात ‘एस्.आय.आर्.’विरोधात आंदोलने करणार्यांचा या अंतर्गत पाकिस्तान्यांना पाठिंबा आहे. भारतीय राजकारणाचा आपण विचार करतो, तेव्हा दिसून येते की, येथील देशद्रोह्यांची साथ घेतली आणि अंतर्गत पाकिस्तान्यांचे साहाय्य घेतले की, सत्तेत रहाता येते. आपले अंतर्गत पाकिस्तानी ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दुःखी होते. यांच्या विरोधात वैचारिक स्तरावर ‘गझवा-ए-इस्लाम’चा नारा देण्याची आवश्यकता आहे.
हिंदुफोबियाच्या (हिंदुद्वेषाच्या) आकडेवारीकडे लक्ष देणे आवश्यक ! – अशोक श्रीवास्तव, संपादक, डीडी न्यूज
मी माध्यामांमध्येच काम करतो, तरीही सांगू शकतो की, प्रसारमाध्यमे हा आपला सर्वांत मोठा शत्रू आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या काळात भारताची राफेल ही लढाऊ विमाने पाकिस्तानने नव्हे, तर भारतीय माध्यमांनी पाडली. त्या वेळी ‘द हिंदु’ने बातमी केली होती की, पाकिस्तानने भारताची ५ राफेल विमाने पाडली. हे पूर्वीपासूनचे षड्यंत्र आहे.

मोहनदास गांधींच्या हत्येच्या वेळीही ‘न्यू यॉर्क टाईम्स’च्या बातमीचा मथळा होता, ‘गांधी इज किल्ड बाय हिंदू’ : ‘न्यू यॉर्क टाईम्स’ अशा प्रकारची लिबर्टी दुसर्या धर्माविषयी घेऊ शकतो का ?’ ‘अमुक नेत्याची हत्या मुसलमानाकडून झाली’, ‘अमुक नेत्याची हत्या ख्रिस्त्याकडून झाली’, असे मथळे कधी दिले जातात का ? इस्लामी आतंकवादाचा रंग अजूनही पुरोगामी पाहू शकत नाहीत. काही वर्षांपूर्वी ४-५ विद्यापिठांनी एकत्र येऊन कार्यक्रम केला, त्याचे नाव डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व. अशा कार्यक्रमांतून खोटे नॅरेटिव्ह (कथानक) बनवले जाते. आपल्या देशातील चित्रपटगृहांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भगवाधारी साधूंना चोर, बलात्कारी, डाकू दाखवले जाते. हे खोटे कथानक उद्ध्वस्त करण्याची आवश्यकता आहे.
राजकीय नेते हिंदुत्वाला ‘डेंग्यू’, ‘मलेरिया’, ‘एड्स’ म्हणतात, तेव्हा प्रसारमाध्यमे शांत बसतात. त्याच राजकीय नेत्यांना माध्यमे इतर धर्मांविषयी असे विचारतात का ? सध्या इस्लामोफोबियाची (हिंदुद्वेषाची) चर्चा आहे. प्रत्यक्षात हिंदुफोबिया प्रचंड प्रमाणात आहे. हिंदुफोबियाविषयी एक अहवाल आहे. भारतात डिसेंबर २०२५ च्या पहिल्या ११ दिवसांत हिंदूंना केवळ ते हिंदू आहेत; म्हणून त्रास देण्याच्या १०४ घटना घडल्या आहेत. ‘धुरंधर’ आल्यावर म्हटले जाते की, हा इस्लामोफोबिया आहे. प्रत्यक्षात हिंदुफोबियाच्या आकडेवारीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
घुसखोरांसाठी पायघड्या घालायच्या का ?
मतदारसूचीतील विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रिया जर करण्यात येत असेल, तर त्याचे स्वागत आहे. ‘आपले नागरिक कोण आहेत ?’, हे आपल्यालाच ठाऊक नाही. सईदा हमीद ही महिला सोनिया गांधी यांची निकटवर्तीय होती. त्या एकदा म्हणाल्या, ‘‘इतर देशांतून मुसलमान जर येथे येत असतील, तर त्यांना येऊ दिले पाहिजे. ही भूमी अल्लाची भूमी आहे. कुणी आले, तर त्यांना येथे राहू दिले पाहिजे.’’ त्यांना आता सांगितले पाहिजे, ‘‘मुसलमान अल्लाची धरती वर्ष १९४७ मध्ये घेऊन गेले. आता ही भूमी श्रीरामाची आहे.’’
घुसखोरी रोखण्यासाठी विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रिया होत आहे, तर अडचण काय आहे ? देशाच्या न्यायालयांमध्ये पालट होत आहेत, तर ते चांगले आहे. आता प्रसारमाध्यमे तमिळनाडूतील कार्तिकेय दीपम्’चे सूत्र उपस्थित करत आहेत. ही फार प्राचीन परंपरा आहे. ज्या टेकडीवर दीप प्रज्विलत केला जातो, त्याच्या शेजारी दर्गा बांधला, तर दीप लावणे बंद करायचे आहे का ? याविषयी न्यायमूर्तींनी हिंदूंच्या बाजूने निकाल दिला, तर त्यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याची भाषा करण्यात येत आहे. महाभियोग चालवण्याची मागणी करणारे पाकिस्तानातील नाहीत. ते हिंदूंच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांना त्यांच्या चुकीच्या कृतीची जाणीव करून देणे आवश्यक आहे.
प्रत्येक सैनिक सनातन राष्ट्रासाठी लढतो ! – विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त)
ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी समजणे आवश्यक आहे. पहलगाम येथे २६ पर्यटकांची धर्म विचारून निर्घृण हत्या केली गेली. त्याचे मूळ हिंदूद्वेष हे आहे.

सर्जिकल स्ट्राईक आणि त्यापूर्वी केलेले १-२ प्रतिकार सोडले, तर पाकिस्तान सातत्याने कुरापती काढत असतांना गेल्या अनेक वर्षांत भारताकडून प्रतिकारच केला गेलेला नाही. वर्ष २०१४ पासून आपली मानसिकता पालटली आहे. राजकीय इच्छाशक्ती वाढली आहे. पहलगाम येथे आतंकवादी आक्रमण झाल्यानंतर पंतप्रधानांनी तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांना पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी पूर्ण स्वायत्तता दिली. राजकीय इच्छाशक्ती आणि सेनेला स्वायत्तता मिळणे फार आवश्यक आहे. त्यासमवेतच सेनेचे नियोजन फार महत्त्वाचे आहे.
सेनेच्या अतुलनीय शौर्यासमवेत इस्रो, डी.आर्.डी.ओ. यांनी युद्ध तंत्रज्ञानात इतकी प्रचंड प्रगती केली आहे की, त्याला तोड नाही. नवी युद्धसामग्री हे सातत्यपूर्ण होणारे काम आहे. गेल्या ११ वर्षांत हे काम झाले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी लक्ष्यित आक्रमणे कशी केली जातात, हे जगाला पहाता आले. हे सर्व कौशल्य प्राप्त करण्यासाठी सेनेने परिश्रम घेतले आहेत. या सर्व प्रयत्नांचा परिपाक म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे.
सीमेवर देशासाठी लढणार्या सैनिकाची श्रद्धा काय असते ? प्रत्येक प्रशिक्षणाच्या वेळी भारतीय सैनिकामध्ये राष्ट्रीयत्व, राष्ट्रभक्ती रुजवली जाते. प्रत्येक सैनिक प्रथम राष्ट्रासाठी लढतो, त्यानंतर पलटणसाठी लढतो, त्यानंतर स्वतःसाठी लढतो. प्रत्येक पलटणीची काही घोषवाक्ये आहेत. त्यावरून लक्षात येईल की, त्यांची प्रेरणा काय आहे ?
सैन्यातील पलटणींची कांही घोषवाक्ये !
या घोषणा सैनिकांना प्रेरणा देतात. या घोषणांवरूनच लक्षात येते की, प्रत्येक सैनिक सनातन राष्ट्रासाठी लढतो. |
शत्रूराष्ट्रांचा आक्रमक प्रतिकार करणे आवश्यक ! – ब्रिगेडियर संजय अग्रवाल (निवृत्त)

वर्ष १९६२ मध्ये चीनसमवेतच्या युद्धात आपला पराभव झाला होता, हे सांगितले जाते. त्यानंतर ५ वर्षांतच आपण चीनला १९६७ मध्ये प्रचंड पराभूत केले होते; हे मात्र फारसे चर्चेत येत नाही.

आपण आपली बलस्थाने विसरलो आहोत. ‘कोणत्याही शत्रूदेशाविषयी आपले धोरण काय असायला हवे ?’, हे कधीच स्पष्ट करू नये. त्याने आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध रहातात. ऑपरेशन सिंदूरपूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चेतावणी दिली होती की, आवश्यकता पडली, तर अण्वस्त्र धोरणातही पालट केला जाऊ शकतो. या वक्तव्यामुळे अमेरिका, पाकिस्तानसह अनेक देशांचे धाबे दणाणले होते. आपली सैन्यशक्ती हा एक महत्त्वाचा भाग आहे. सामूहिक शक्तीनेच देश विजयी होतो. आपण प्रचंड शक्तीशाली आहोत. आपण आपली शक्ती विसरलो आहोत. आपल्या शक्तीची जाणीव होण्यासाठी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासारख्या महोत्सवांची आवश्यकता आहे. शक्तीचा जागर करण्यासाठी तात्कालीक ध्येय, मध्यम ध्येय आणि दीर्घकालीन लक्ष्य ठेवले पाहिजे. ‘ऑफेन्सिव्ह डिफेन्स’ क्रिकेटमध्येही नसतो. केवळ क्षेत्ररक्षण (फिल्डिंग) करून सामना जिंकू शकत नाही. धावाही कराव्या लागतात. ते आता युद्धाच्या बाबतीत आता करत आहोत. तिबेट आणि तैवान या चीनच्या रेड लाईन आहेत. त्या चेकमेटचे कारण आहेत. युद्धात त्यांचा समावेश शेवटीच करायला हवा.
काश्मिरी हिंदू खोर्यात परतणे, ही काश्मीरमध्ये भारताची घरवापसी ! – राहुल कौल, अध्यक्ष, ‘यूथ फॉर पनून काश्मीर’
अनेकांना वाटते काश्मिरी हिंदूंच्या व्यथा वर्ष १९४७ मध्ये झालेल्या फाळणीनंतरच्या आहेत. प्रत्यक्षात तो मोठा भ्रम आहे. वर्ष १९९० मध्ये झालेले काश्मिरी हिंदूंचे पलायन हे सातवे पलायन होते.

वर्ष १९४७ पर्यंत धर्माच्या कारणाने काश्मिरी हिंदूंचे ५ वेळा पलायन झाले होते. आपण जिहाहला ‘जिहाद’ म्हणायला घाबरतो. आपण त्याला ‘आतंकवाद’ म्हणतो. आज आपलेच सरकार काश्मिरी हिंदूंच्या छळाला ‘वंशविच्छेद’ म्हणायला नाकारते. काश्मीरमध्ये जिहादच्या मूळांना खत-पाणी घातले, तर त्याच्या फांद्या देशभर पसरणारच आहेत. काश्मिरी हिंदूंचे काश्मीर खोर्यात परतणे, ही काश्मीरमध्ये भारताची घरवापसी आहे. काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंची घरवापसी झाली की, भारतात हिंदूंच्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन होईल, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

वर्ष १९९० पूर्वी जे हिंदू काश्मीरमध्ये रहात होते, ते वेगवेगळ्या जिल्ह्यांत रहात होते. तेथे इस्लामचे वर्चस्व वाढत होते. काश्मीरमध्ये हिंदू राजकीयदृष्ट्या कधीच सक्षम होऊ शकले नाहीत; कारण भौगोलिकदृष्ट्या ते विखुरलेले होते. हे पुन्हा येण्यासाठी काश्मीरमध्ये केंद्रशासित प्रदेश निर्माण व्हायला पाहिजे. देशनिष्ठ काश्मिरी हिंदू येथे येऊन राहू शकतात, असे तेथे वातावरण निर्माण झाले पाहिजे. आता वेळ प्रतिकार करण्याची वेळ आहे. १६ जानेवारी २०२६ या दिवशी आम्ही अष्टभैरव, जगदंबा यांचे आवाहन करून जम्मूमध्ये आंदोलन चालू करणार आहोत. काश्मिरी हिंदूंना जोपर्यंत विचारले जात नाही की, तिथे जाण्यात काय अडचण आहे ? तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.
कलम ३७० हटवले, तेव्हा तो मोठा निर्णय होता;. पण त्यानंतर काश्मिरी हिंदूंची काश्मीर खोर्यात वापसी करण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. त्यासाठी आम्ही आता प्रयत्न करणार आहोत. देशवासियांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन आहे.
स्वतःच्या परीने धर्मासाठी कार्य करत रहा ! – निरज अत्री, अध्यक्ष, ‘नॅशनल सेंटर फॉर हिस्टोरिकल रिसर्च अँड कम्पॅरिटिव्ह स्टडीज’
आजचे सगळेच युवक एकसारखे विचार करतात, असे नाही. आंदोलनात पुढे काही तरुणही असतात. त्यांच्या मागे शक्ती वेगळ्या असतात.

आजच मी बंगळुरुवरून येत होतो. विमानतळावर २५-३० युवक भजने म्हणत होते. ही आपली युवा पिढी आहे. शिक्षणव्यवस्था, माध्यमे यांत आता पालट होत आहेत. युवकांची माथी भडकवणार्यांना यथासंभव उत्तर दिले जाईल.

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या आक्रमणाच्या वेळी तुकाराम ओंबाळे यांच्या हातात केवळ लाठी होती. तिच्या साहाय्याने त्यांनी कसाबला पडकले आणि काँग्रेस सरकारने त्या वेळी रचलेल्या भगव्या आतंकवादाचे षडयंत्र नष्ट झाले आणि काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लागला. या कृतीने इतिहासाची दिशा पालटली. त्यामुळे स्वतःच्या परीने धर्मासाठी कार्य करत रहा.
हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी आग्रह धरला पाहिजे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश या पुरोगाम्यांच्या हत्यांनंतर फार गवगवा केला गेला. त्याचा अभ्यास करतांना दिसले, त्यांच्या जीवनात नक्षलवाद्यांशी कुठेतरी संबंध आला आहे. ‘हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी या सर्वांना मारले’, ही त्यांची थेअरी आहे.

अर्बन नक्षलवाद्यांनी किती भारतियांना मारले, हे किती जणांना माहिती आहे ? १४ सहस्र हा त्याचा आकडा आहे. यामध्ये सामान्य नागरिकांसह आमदार, सरपंच आदिवासी सगळेच आहेत. कोणी म्हणाले, ‘पुष्कळ संख्येने नक्षलवादी सरकारसमोर शरणागती पत्करत आहेत. तर अर्बन नक्षलवाद संपेल का ?’ साम्यवाद आणि अर्बन नक्षलवाद एकच आहेत. त्यामुळे अर्बन नक्षलवाद सहजासहजी संपणार नाही. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सीमेवरच्या सैनिकाची भूमिका बजावली पाहिजे. इस्रायल बनले नव्हते, तेव्हा ज्यू दरवर्षी एकत्र येत असत आणि म्हणत, ‘पुढच्या वर्षी आपण इस्रायलमध्ये भेटू.’ ते स्वप्न बघत होते. आपणही हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी आग्रह धरला पाहिजे.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’