
पुणे, ८ एप्रिल (वार्ता.) – रामनवमीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड, तसेच पुणे जिल्ह्यातील श्रीराममंदिराच्या परिसरात ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शन कक्ष लावण्यात आले. त्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रीरामनवमीला श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटीने अधिक कार्यरत असते. याचा लाभ घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने श्रीरामनवमी सामूहिक नामजप आणि प्रवचन आयोजित करण्यात आले होते.
या वेळी श्रीरामनवमीचे महत्त्व सांगून श्रीरामनामाचा जप करून श्रीरामाची कृपा संपादन करण्याविषयी उपस्थितांना सांगण्यात आले. पुणे जिल्ह्यात सत्संगातील जिज्ञासूंनी प्रभु श्रीरामचंद्राची कृपा संपादन करण्यासाठी फलकप्रसिद्धीची सेवा तळमळीने केली.
मान्यवरांच्या भेटी
१. मावळचे शिवसेना खासदार श्री. श्रीरंग बारणे यांनी रहाटणी श्री राममंदिर ग्रंथप्रदर्शनास भेट दिली.

२. केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ कोथरूड येथील ग्रंथप्रदर्शनास भेट दिल्यावर त्यांना ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

३. भाजपचे नगरसेवक श्री. हरेश तापकीर यांनी रहाटणी येथील ग्रंथप्रदर्शनास भेट दिली. ६ एप्रिल या दिवशी त्यांचा जन्मदिवस होता, त्या निमित्त त्यांना ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

वैशिष्ट्यपूर्ण
पिंपळे सौदागर येथील श्री डबलेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. तांबे यांनी कक्षाला भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.