ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे खंडणी प्रकरण
सातारा, ७ एप्रिल (वार्ता.) – ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मोठे वृत्त समोर आले आहे. सेवानिवृत्त आय.ए.एस्. अधिकारी तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या पुणे येथील निवासस्थानी सातारा पोलिसांनी चौकशी केली. ही चौकशी ३ घंटे चालू होती; मात्र याविषयी देशमुख यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.
गत मासात १ कोटी रुपयांची खंडणीची रक्कम घेतांना एका महिलेला सातारा पोलिसांनी रंगेहात पकडले होते. या महिलेची चौकशी चालू असतांना पत्रकार तुषार खरात आणि प्रभाकर देशमुख यांचे भ्रमणभाष या महिलेला गेले असल्याचे चौकशीत समोर आले. पत्रकार तुषार खरात यांनाही सातारा पोलिसांनी अटक केली आहे.