मुंबई : धारावी येथून घराबाहेर पडलेला ९ वर्षांचा मुलगा रेल्वेतून प्रवास करत कुर्ला रेल्वे स्थानकात उतरला. रेल्वेच्या पुलावरून तो एकटाच फिरत होता. तेव्हा महंमद सलमान अनुसरूल हक (वय १९ वर्षे) याने त्याला खाऊचे आमीष दाखवत निर्जनस्थळी नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. या वेळी मुलगा ओरडत होता. तेव्हा त्याचा चेहरा खाली मातीत दाबून त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत चुनाभट्टी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने आरोपीला अटक केली आहे.
मुलाच्या संपूर्ण अंगावर जखमा असून आरोपीने मुलाची हत्या करण्यापूर्वी त्याला मारहाण केल्याचे समोर आले.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षाच करायला हवी ! |