Chemical Attack on Schoolgirls In Karnataka : गदग (कर्नाटक) येथे रसायनमिश्रित रंग फेकल्याने ४ विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास; रुग्णालयात भरती

पीडित विद्यार्थिनींना रुग्णालयात नेताना

गदग (कर्नाटक) – येथील सुवर्णगिरी तांडा बस स्थानकावर शाळेत जाण्यासाठी बसची वाट पहात असलेल्या विद्यार्थिनींवर काही जणांनी रसायनमिश्रित रंग फेकला. त्यामुळे ४ विद्यार्थिनी आजारी पडल्या आणि त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. विद्यार्थिनींना छातीत दुखणे आणि श्वास घेणे, असे त्रास होत आहेत.