‘मला माझ्यापेक्षा मोठ्या चुलत बहिणीच्या १३ व्या दिवसाच्या कार्यासाठी गावी जावे लागले. गावी गेल्यावर मी माझ्या काही नातेवाइकांच्या घरी जाऊन आलो. गावी जाण्यापूर्वीची माझी मन:स्थिती, नातेवाइकांकडे गेल्यावर अनुभवायला मिळालेली सूत्रे, तसेच नातेवाइकांची घरे आणि सनातन संस्थेचे आश्रम यांमध्ये मला जाणवलेले भेद येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

१. गावी अधिक दिवस रहावे लागणार असल्याने मनावर आलेल्या ताणासंदर्भात उत्तरदायी साधिकेशी बोलून तिने सांगितल्याप्रमाणे शिकण्याचा दृष्टीकोन ठेवून गावी जाणे
एकदा मला चुलत बहिणीच्या (माझ्या मोठ्या काकांच्या मुलीच्या, म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीच्या) १३ व्या दिवसाच्या कार्याला गावी जावे लागणार होते. तेथे मला १५ दिवस रहावे लागणार होते. मला गावी अधिक दिवस रहावे लागणार असल्यामुळे माझ्या मनावर थोडा ताण आला होता; कारण मी पुष्कळ वर्षांनी आश्रमाबाहेर रहाण्यासाठी जाणार होतो. मी पूर्वी अशा प्रसंगांत एका आठवड्यातच आश्रमात परत यायचो. माझ्या मनात सारखा गोंधळ चालू झाल्यामुळे मी अस्वस्थ होतो. त्यासाठी मी माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्या साधिकेशी त्याविषयी बोललो. मी त्यांना माझ्या मनात चालू असलेल्या गोंधळाविषयी मनमोकळेपणे सांगितले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्हाला आश्रमजीवन आणि समाजजीवन कसे असते ?, हे शिकण्यासाठी गुरुदेव पाठवत आहेत’, असा विचार ठेवा.’’ त्यानंतर मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे विचार ठेवून गावी गेलो.
२. साधकाला साधना न करणार्या नातेवाइकांची घरे आणि त्यांचे वागणे अन् रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील साधक आणि साधकांचे नातेवाईक यांचे वागणे यांमध्ये जाणवलेले भेद
३. साधक-नातेवाइकांच्या घरी गेल्यावर जाणवलेली सूत्रे
३ अ. नातेवाइकांच्या घरी सर्व जण साधक असल्याने त्यांच्याकडे केवळ साधनेविषयीच बोलणे होणे आणि नामजपाच्या वेळी ‘मी आश्रमातच बसलो आहे’, असे वातावरण जाणवणे : या नातेवाइकांचे वैशिष्ट्य, म्हणजे या घरातील सर्व व्यक्ती साधकच आहेत. त्या ‘सनातन संस्थे’च्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना साधना, देव, भाव इत्यादी विषयांवर बोलले जायचे. या कुटुंबातील व्यक्ती साधनेला अधिक महत्त्व देतात. या नातेवाइकांकडे ‘मी नामजप करण्यासाठी बसलो असतांना ‘मी आश्रमातच नामजप करण्यासाठी बसलो आहे’, असे वातावरण मला जाणवत होते.
३ अ १. नातेवाइकांनी स्वतःचे घर हे गुरूंचा आश्रमच असल्याचा भाव ठेवल्याने त्यांच्या घरी चांगली स्पंदने जाणवणे : या नातेवाइकांच्या घरातील सर्व जण साधक असल्याने ‘त्यांनी त्यांचे घर हे गुरूंचा आश्रमच आहे’, असा भाव ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या घरी मला आश्रमात ज्या प्रकारची स्पंदने जाणवतात, त्या प्रकारची स्पंदने जाणवली.
३ आ. साधक-नातेवाईक असल्याने त्यांच्या घरी रामनाथी आश्रमासारखी स्पंदने जाणवली.
४. शिकायला मिळालेले सूत्र
साधकांनी ‘आपले घर, म्हणचे आश्रमच आहे’, असा भाव ठेवला आणि आश्रमातील कार्यपद्धतींप्रमाणे आपले आचरण ठेवल्यास त्या ठिकाणीही ‘आश्रमातील वातावरणाची अनुभूती येते’, असे मला शिकायला मिळाले.
५. निष्कर्ष
सर्व नातेवाइकांकडे जाऊन आल्यावर तेथील वातावरण, त्यांच्या कृती, बोलणे यांवरून ‘आश्रमजीवन हे सर्वांत आनंददायी जीवन आहे’, असे माझ्या लक्षात आले.
कृतज्ञता
गुरुदेवांनी मला १५ दिवसांत विविध प्रकारचे प्रसंग दाखवले. हे सर्व अनुभवतांना माझ्या लक्षात आले, ‘आश्रमजीवन किती महत्त्वाचे आहे !’ यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. चेतन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१.२०२३)