4-Year-Old Raped : मदरशात शिकणार्‍या १६ वर्षांच्या मुलाने केला ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील भोजपूर परिसरात एका मदरशात शिकणार्‍या १६ वर्षांच्या मुसलमान मुलाने एका चार वर्षांच्या मुलीला ऊस देण्याच्या बहाण्याने शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलीने विरोध केला, तेव्हा तिला अमानुष मारहाण करण्यात आली. यानंतर त्याने धमकी दिली की, जर तिने कुणाला सांगितले, तर तो तिला मारून टाकेल.

पीडित मुलगी रडत घरी पोचली. कुटुंबातील सदस्यांना वाटले की, त्यांच्या मुलीला  दुखापत झाली आहे; पण रुग्णालयात नेले असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले. मुलीने तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविषयी सांगितल्यावर संतप्त कुटुंबाने पोलिसात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे मोदीनगरचे पोलीस उपअधीक्षक ज्ञान प्रकाश राय यांनी सांगितले. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. बलात्कार करणारा अल्पवयीन मुलगा स्थानिक मदरशात शिक्षण घेतो, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

संपादकीय भूमिका

मदरशांत शिकणार्‍या मुलांकडून बलात्कार, हत्या यांसारखे गंभीर गुन्हे घडत असल्याचे सातत्याने समोर येते. यावरून त्यांना देण्यात येणार्‍या शिक्षणाचे अन्वेषण झाले पाहिजे, तसेच देशभरातील मदरशांना ताळे ठोकले पाहिजे !