
पुणे, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – टिळक रोड येथील मा.स. गोळवलकर गुरुजी विद्यालय (प्राथ.), येथे इयत्ता आठवीत शिकणार्या कु. अर्चिता मधुसूदन सोन्ना हिला गुणवंत विद्यार्थिनी म्हणून पारितोषिक मिळाले. ती शिक्षकांचे आज्ञापालन करते, सर्वांशी नम्रतेने वागते, सर्व कृती तत्परतेने करण्याचा प्रयत्न करते. ती सिंहगड रस्ता येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. मानसी मधुसूदन सोन्ना यांची कन्या आहे. ती सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करते.