गुंगीचे औषध देऊन गोहत्येसाठी गायीला चोरण्याचा डाव फसला

अंबरनाथ येथील प्रकार !

अंबरनाथ –  येथील जावसई परिसरातील वाघवाडीतील तुषार लोंढे आणि अक्षय वाघचौरे यांच्या गायी चरायला गेल्या होत्या; पण रात्री ८ वाजता ३ गायी सापडत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शोध घेतांना तिघे एका गायीला ब्रेड खायला देत असल्याचे लक्षात आले. तोपर्यंत गायी चोरणारे तिघे पळून गेले; पण गाय बेशुद्ध पडली होती. तिला गुंगीचे औषध देऊन चोरण्याचा डाव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यात एकाला पकडण्यात आले. त्याने गोहत्येसाठी गाय चोरत असल्याचे मान्य केले. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका

  • गोहत्येसाठी गोवंशियांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्याचे प्रकार पहाता गोवंशहत्या बंदी कायद्याचा फोलपणा उघड होतो !
  • अशा गोहत्यार्‍यांना कठोर शिक्षाच करायला हवी !