मुंबई – शक्ती कायदा अनेक कायद्यांचा अधिक्षेप आहे. शक्ती कायद्याविषयी केंद्रीय गृहमंत्रालयाने काही आक्षेप घेतले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांवर या कायद्याचा अधिक्षेप होत होता. त्यामुळे शक्ती कायद्यामध्ये पालट करण्याची आवश्यकता होती. त्यात पालट करण्यापूर्वी केंद्रशासनाने नवीन कायदे सिद्ध केले आहेत. शक्ती कायद्यातील बहुतांश गोष्टी केंद्रशासनाच्या नवीन संहितेत आहेत. त्यामुळे शक्ती कायद्याचा आम्ही पुन्हा एकदा आढावा घेऊ आणि आवश्यक असेल, तर पुढील कार्यवाही करू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्ती कायद्याविषयी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे व्यक्त केली.