‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी ध्यानमंदिरात नमस्कार करण्यासाठी गेले असतांना मला पुढील ओळी सुचल्या.’

निमित्त कोणतेही असू दे ।
गुरुचरणी सतत दंडवत घडू दे ।। १ ।।
स्वभावदोष अहं यांचा लय होऊ दे ।
गुरुचरणी लीन होऊ दे ।। २ ।।
नको माया, नको काही ।
घडू दे गुरुचरणांची सेवा ।। ३ ।।
हेच मागणे आता राहिले ।
बाकी सारे लोप पावले ।। ४ ।।
– सौ. नीला रमेश गडकरी (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |