निरंजनी आखाड्यात साध्वी मंजू यांचा महामंडलेश्‍वर म्हणून पट्टाभिषेक !

महामंडलेश्‍वर मंजू गिरी देवी

प्रयागराज, २ फेब्रुवारी (वार्ता.) – आनंद आखाड्यातील साध्वी मंजू गिरी देवी यांचा निरंजनी आखाड्यात महामंडलेश्‍वर म्हणून पट्टाभिषेक करण्यात आला. निरंजनी आखाड्यात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पट्टाभिषेकाचा हा सोहळा पार पडला. या प्रसंगी निरंजनी आखाड्याचे पीठाधीश्‍वर आचार्य महामंडलेश्‍वर श्री कैलाशानंद पुरी महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरी महाराज, आनंद आखाड्याचे पीठाधीश्‍वर श्री बालकानंद महाराज आदी संत, मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित सर्व संत, महंत, महामंडलेश्‍वर आदींनी साध्वी मंजू यांना पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला. या वेळी महामंडलेश्‍वर मंजू देवी गिरी यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला.