मॉरिशसचे कला आणि सांस्कृतिक मंत्री महेंद्र गोंदिया यांची अलंकापुरीस भेट !

श्रीमंत दगडूशेठ गणपतीचेही दर्शन घेतले !

मॉरिशसचे कला आणि सांस्कृतिक मंत्री महेंद्र गोंदिया यांनी श्रींचे संजीवन समाधी मंदिरात दर्शन घेतले

आळंदी (जिल्हा पुणे) – येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास मॉरिशसचे कला आणि सांस्कृतिक मंत्री महेंद्र गोंदिया यांनी सदिच्छा भेट देऊन श्रींचे संजीवन समाधी मंदिरात दर्शन घेतले, तसेच त्यांनी पुणे दौर्‍यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीचेही दर्शन घेतले. केवळ दर्शन हा उद्देश न ठेवता त्यांनी श्रीमंत दगडूशेठ ट्रस्टचे सामाजिक कार्य उत्सुकतेने समजावून घेतले, तसेच त्यांनी विश्वस्तांना एखाद्या चतुर्थीला मॉरिशसमधील गणेश मंदिरात येण्यास निमंत्रण दिले.