प्रयागराज – १० देशांचे २१ सदस्यीय आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ महाकुंभपर्वाला भेट देणार असून ते पवित्र त्रिवेणी संगमत स्नान करणार आहे. हा उपक्रम केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रचार आणि सार्वजनिक मुत्सद्दी विभागाद्वारे आयोजित करण्यात आला आहे. हे शिष्टमंडळ १५ जानेवारीला प्रयागराजला पोचले असून त्यांची निवासव्यवस्था अरैल क्षेत्रातील टेंट सिटी येथे करण्यात आली आहे. सायंकाळी या शिष्टमंडळाने कुंभक्षेत्राची पहाणी केली. १६ जानेवारीला सकाळी सर्व सदस्य संगमात स्नान करणार आहेत. या शिष्टमंडळात फिजी, फिनलँड, गयाना, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद आणि संयुक्त अरब अरित या १० देशाच्या सदस्यांचा समावेश आहे.