‘१८.५.२०२४ या दिवशी फोंडा, गोवा येथील साधक श्री. शिवदत्त नाडकर्णी हे आमच्या घरी आले होते. बैठकीच्या खोलीतील पटलावर आम्ही ‘छायाचित्रमय जीवनदर्शन – खंड ४ परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य आणि आध्यात्मिक संशोधन’ हा ग्रंथ ठेवला आहे. या ‘ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील गुरुदेवांच्या छायाचित्रांमध्ये पालट झालेले आहेत’, असे त्यांना दिसले.
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/06/24212211/ppdr_bhag3__mergd_2_c_320.jpg)
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मोठ्या छायाचित्रात जाणवलेले पालट
अ. छायाचित्रात गुरुदेवांचे केस मोरपंखी झाले आहेत.
आ. छायाचित्रातील गुरुदेवांचे मुख पिवळे दिसत असून आणि ‘हे छायाचित्र निर्गुण तत्त्वाकडे जात आहे’, असे वाटते.
इ. गुरुदेवांच्या मस्तकाभोवतीच्या प्रभावळीला गुलाबी छटा आली आहे.
ई. गुरुदेवांचा सदरा मध्यभागी गुलाबी रंगाचा दिसत आहे.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वर्तुळातील ३ लहान छायाचित्रांत झालेले पालट
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/03/03215522/2024_march_vanita_bicchu_H_C.jpg)
अ. मुखपृष्ठावरील उजवीकडून पहिल्या वर्तुळातील छायाचित्र निर्गुण तत्त्वाचे वाटत असून गुरुदेवांच्या दोन्ही हाताचा रंग पिवळा झाला आहे.
आ. मधल्या वर्तुळातील छायाचित्रात पालट दिसत नाहीत.
इ. तिसर्या वर्तुळातील छायाचित्रात निर्गुण तत्त्व अधिक प्रमाणात जाणवते आणि हाताचा पंजा पिवळा दिसत आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे हे पालट झाले आहेत. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते !’
– सौ. वनिता बिच्चू (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६९ वर्षे), फोंडा, गोवा. (१७.६.२०२४)
|