![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/05/11224454/ppdr_bhag3__mergd_2_c_320-1.png)
१. सौ. संतोशीला कदम, विजयपुरा, कर्नाटक.
अ. ‘मी वाहनातून प्रवास केल्यावर मला नेहमी कंबर आणि पाय दुखण्याचा त्रास होतो; परंतु ब्रह्मोत्सवासाठी गोव्यापर्यंतचा लांबचा प्रवास करूनही मला काहीच त्रास झाला नाही.
आ. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) कार्यक्रमस्थळी येत असतांना अतिशय थंड वारा वाहू लागला.
इ. गुरुदेवांना रथातून येतांना पाहून मला आनंद झाला. १० – १५ मिनिटे माझ्या मनात कोणताच विचार आला नाही. ‘गुरुदेवांना पुनःपुन्हा पहावे’, असे मला वाटत होते.
ई. गुरुदेवांचे दर्शन घेतल्यावर ‘या जन्मी मला मुक्ती मिळाली’, असे मला वाटले.
उ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहिल्यावर ‘साक्षात् देवताच पृथ्वीवर आल्या आहेत’, असे मला वाटले. त्यांचे चैतन्यमय चेहरे पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली.’
२. सौ. कृष्णवेणी, रायचूर, कर्नाटक.
अ. ‘ब्रह्मोत्सवासाठी गोवा येथे जायचे असल्याचे कळल्यावर माझी पुष्कळ भावजागृती झाली.
आ. मागील मासात माझे पुष्कळ पैसे व्यय झाले होते. ब्रह्मोत्सवाला जाण्यासाठी मला पैशांची आवश्यकता होती. ‘गुरुदेवच सर्व व्यवस्था करतील’, असा विचार करून मी कार्यालयात गेले. मी संध्याकाळी घरी येतांना कार्यालयातील साहेबांनी मला बोलावले आणि सहजपणे पैसे दिले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला.
इ. गुरुदेवांना पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली.
ई. वातावरणात पुष्कळ उष्णता होती, तरीही माझ्या मनात कुठलाही नकारात्मक विचार न येता मला आनंद मिळाला.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १९.७.२०२४)
|