५० लाख रुपयांची हानी !
कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली) : शहरातील मिथुन शेट्टी यांच्या एम्.एस्. या स्पेअर पार्ट (वाहनांचे सुट्टे भाग) दुकानाला भीषण आग लागून दुकानातील अनुमाने ५० लाख रुपयांचा माल भस्मसात् झाला. ही घटना ७ डिसेंबर या दिवशी घडली. अग्नीशमनदलाच्या गाडीतून पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र गाडीतील पाणी संपले, तरीही आग आटोक्यात आली नाही.