३.१२.२०२४ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणार्या चि.सौ.कां. वैद्या शर्वरी बाकरे आणि वाळपई (गोवा) येथील चि. अमोघ जोशी यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त सहसाधकांना चि.सौ.कां. शर्वरी यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. अमोघ जोशी आणि चि.सौ.कां. वैद्या शर्वरी बाकरे यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ! |
१. श्री. सुरेश कदम
१ अ. व्यष्टी साधनेत सवलत न घेणे : ‘शर्वरी व्यष्टी साधनेचे प्रयत्न नेहमी चिकाटीने करते. त्यात सवलत घेण्याचा तिचा भाग नसतो. तिची व्यष्टी साधना चांगली असल्याने ती नेहमी आनंदी असते.
१ आ. सेवेची तळमळ असणे : शर्वरीची आई मागील काही दिवसांपासून रुग्णाईत आहे. शर्वरी आईची सेवा मनापासून आणि भाव ठेवून करते. आईची सेवा करतांना धावपळ झाल्यास त्याविषयी तिची कधीही तक्रार नसते. आईची सेवा करून ती अन्य आश्रमसेवाही करते. तिच्या कृतीतून तिची सेवेविषयीची तळमळ लक्षात येते.’
२. सौ. श्रद्धा
२ अ. आवड-नावड नसणे : ‘शर्वरीला कपडे किंवा अलंकार या गोष्टींची आवड-नावड नाही. तिला ‘अमुक एखादी वस्तू हवी आहे किंवा घ्यायची आहे’, असे तिच्या बोलण्यात कधीही नसते. तिच्याकडे आवश्यक तितक्याच वस्तू असतात आणि जे आहे, त्यात ती समाधानी असते.
२ आ. परेच्छेने वागणे : विवाहाची पूर्वसिद्धता करतांना शर्वरी स्वतःच्या आवडीप्रमाणे न करता आईला किंवा अन्य कुटुंबियांना विचारून सर्व गोष्टींमधील निर्णय घेत होती.
२ इ. परिपूर्ण नियोजन करणे : रुग्णाईत आईची सेवा असो, घरी काही दिवसांसाठी गेल्यावर तिथे करायची काही कामे असोत किंवा अन्य सेवा असोत, शर्वरी प्रत्येक गोष्टीचे परिपूर्ण नियोजन करते. आईच्या सेवेत कुठलीही गोष्ट उणी पडणार नाही किंवा आईला त्रास होणार नाही, याची ती पूर्ण काळजी घेते.
२ ई. कठीण परिस्थितीतही आनंदी असणे : मध्यंतरी शर्वरीच्या आईची प्रकृती पुष्कळ खालावली होती. त्या काळात शर्वरीला काही दिवस घरी रहावे लागले आणि तिची पुष्कळ धावपळही झाली; तरी ती तेवढीच आनंदी होती.’
(सर्व सूत्रांचा दिनांक २१.११.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |