कासगंज (उत्तरप्रदेश) येथे २६ जानेवारी २०१८ मध्ये तिरंगा यात्रेवर मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात चंदन गुप्ता या हिंदूला धर्मांधांनी लक्ष्य करून त्याची हत्या केली. या प्रकरणी २८ आरोपींना दोषी ठरवले आणि दोघांची निर्दोष सुटका केली. न्यायालयाने या २८ जणांना जन्मठेप दिली असली, तरी या प्रकरणात ७ वर्षांनी मिळालेला निकाल हा अन्यायकारक म्हणावा लागेल. चंदनच्या वडिलांनी निकालानंतर प्रसारमाध्यमांना दिलेली माहितीही धक्कादायक आहे. स्वतःच्या मृत मुलाचा खटला चालवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी असलेल्या काही साक्षीदारांनी धर्मांधांच्या दबावाने माघार घेणे आणि चंदनचा सख्खा भाऊ हा एकमेव प्रत्यक्षदर्शी असतांनाही त्याला पोलीस संरक्षण न मिळणे, हे भारतीय न्याय अन् पोलीस व्यवस्था यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. ‘दोषींना शिक्षा होण्यासाठी स्वतः मरायला सिद्ध आहे’, हे चंदनच्या वडिलांचे वाक्य त्यांना न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त न करणारे आहे.
१ सहस्र वर्षांपूर्वी मुसलमान आक्रमकांनी भारतावर आक्रमणे केली. त्या वेळेपासून धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर अत्याचार चालू आहेत. आजही भारतात ठिकठिकाणी हिंदूंचे नेते, सामान्य हिंदु तरुण, रामनवमी-हनुमान जयंतीच्या मिरवणुकांमध्ये सहभागी होणार्या हिंदूंवर आक्रमणे झाली आणि त्यातील काहींच्या निर्घृण हत्याही करण्यात आल्या आहेत; परंतु यांतील एकाही प्रकरणाची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली नाही. चंदन गुप्तासारख्या अनेक निष्पापांची ते केवळ ‘हिंदु’ असल्यावरून धर्मांधांनी हत्या केली आहे. धर्मांध मुसलमान खुसपट काढून हिंदूंवर आक्रमण करण्याची संधी शोधत असतात; परंतु धर्मांधांनी हे लक्षात घ्यावे की, ‘तुम्ही कुणाचे वाईट कराल, तर तुमच्या समवेतही वाईटच होईल. या जन्मात नाही, तर पुढील जन्मात ईश्वर तुमच्या कर्माचे फळ देतोच’, या सिद्धांतावर हिंदूंची श्रद्धा आहे. भारतावर वेगवेगळ्या कालखंडामध्ये आक्रमण करणार्या किंवा भारतियांशी निष्ठूरपणे वागणार्या विदेशींचाही शेवट अतिशय वाईट झाला आहे. असे जरी असले, तरी हिंदूंनी परिणामकारक संघटन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. धर्मांधांच्या हातून अत्याचार सहन केलेल्या हिंदूंच्या पाठीमागे ठामपणे उभे रहाण्यासाठी हिंदूंनी पुढे यायला हवे. चंदन गुप्ता यांच्या वडिलांनी जो एकटेपणा अनुभवला, तो अन्य कुठल्याही पीडित हिंदूच्या वाट्याला येऊ नये, यासाठी हिंदूंनी प्रयत्न करायला हवेत. हिंदू संघटित झाले, तर त्यांच्यात बंधुभाव वाढेलच, त्यासह त्यांच्याकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धर्मांधांचे धाडस होणार नाही, हे निश्चित !