बालसाधकाला आलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि पू. जयराम जोशी यांच्यामधील चैतन्याची प्रचीती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ७ – ८ मासांपूर्वी नागपूर येथे आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी माझ्याशी बोलतांना माझ्या खांद्यावर हात ठेवला. नंतर मी रामनाथी आश्रमात आल्यानंतर श्री भवानीदेवीच्या मंदिरात गेलो. तेव्हा मला अगदी तसाच स्पर्श माझ्या उजव्या खांद्यावर जाणवला.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
पू. जयराम जोशीआजोबा
कु. श्रीवल्लभ जोशी

२. साधकाने पू. जयराम जोशीआबा पहुडलेल्या पलंगाखाली नकळतपणे पाय ठेवणे आणि नंतर त्याला ‘त्याचे पाय पूर्णपणे गुलाबी झाले आहेत’, असे जाणवणे

‘आम्ही नागपूर येथून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात येण्याआधी मिरज आश्रमात विश्रांती घेण्यासाठी थांबलो होतो. तेव्हा माझी तेथे पू. जयराम जोशीआबांशी (सनातनचे ५१ वे संत, वय ८६ वर्षे) भेट झाली. ते पलंगावर पहुडले होते. मी त्यांच्याशी बोलत असतांना मी माझे पाय नकळत त्यांच्या पलंगाखाली ठेवले. त्यांच्याशी बोलणे झाल्यानंतर माझे माझ्या पायांकडे लक्ष गेले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘माझे पाय पूर्णपणे गुलाबी झाले आहेत.’

३. प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केल्यानंतर थकवा दूर होऊन सेवा करण्यासाठी ऊर्जा मिळणे

मी रामनाथी आश्रमात असतांना मला सेवा केल्यानंतर पुष्कळ थकवा जाणवत असे, तरीही मला सेवा करण्याची इच्छा असे. त्या वेळी मी प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केल्यानंतर सूक्ष्मातून ‘कुणीतरी माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे’, असे मला जाणवत असे. त्यानंतर मला आलेला थकवा दूर होत असे आणि मला सेवा करण्यासाठी ऊर्जा मिळत असे.’

– कु. श्रीवल्लभ जोशी (वर्ष २०२३ मधील आध्यात्मिक पातळी ५६ टक्के, वय १६ वर्षे), नागपूर (२३.५.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक