(‘गझवा-ए-हिंद’ म्हणजे भारताच्या इस्लामीकरणासाठी पुकारलेले युद्ध)
इंदूर (मध्यप्रदेश) – येथील छत्रीपुरा पोलीस ठाणे परिसरात हिंदु आणि धर्मांध मुसलमान यांच्यात वाद झाला होता. अशातच २ नोव्हेंबरला ‘हिंद रक्षक संस्थे’चे सदस्य एकलव्य सिंह गौड यांनी सामाजिक माध्यमांवर एक छायाचित्र पोस्ट केले. यामध्ये शहरातील कागदीपुरा भागातील एका मशिदीवर ‘गझवा-ए-हिंद’चा संदेश देणारे भित्तीपत्रक दिसत आहे. छत्रीपुरा पोलीस ठाण्याचे प्रमुख के.पी. यादव यांनी सांगितले की, हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आले असून अन्वेषण चालू आहे.
याचे वर्णन करतांना गौड म्हणाले की, यात युद्धाचे दृश्य दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये सैनिकांच्या हातात भगवे ध्वज आहेत. हे चित्र म्हणजे सनातन धर्माला चेतावणी आहे, तसेच ते जिहादी मानसिकतेला प्रोत्साहन देते. दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. ही काही किरकोळ घटना नसून ती गांभीर्याने घेतली पाहिजे. भारतामध्ये अनेक इस्लामी संघटना सक्रीय आहेत, ज्या ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, धर्मांतर इत्यादी कारवायांत गुंतलेल्या आहेत.
संपादकीय भूमिका
|