Chennai Protest On Brahmin Attack : चेन्नई (तमिळनाडू) येथे ब्राह्मणांवरील आक्रमणाच्या विरोधात ‘हिंदू मक्कल कत्छी’कडून मोर्चा  

  • ५ सहस्रांहून अधिक लोक उपस्थित

  • ब्राह्मणांवरील आक्रमणाचा निषेध करणारा ठराव संमत

  • ब्राह्मण समाजाची अपकीर्ती करणार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी

(हिंदू मक्कल कत्छी म्हणजे हिंदु जनता पक्ष)

मोर्चाला उपस्थित ब्राह्मण समजातील नागरिक

चेन्नई (तमिळनाडू) – ब्राह्मणांचे संरक्षण करण्यासाठी आणि ब्राह्मण समाजावरील आक्रमणे रोखण्यासाठी ‘हिंदू मक्कल कत्छी’ने ३ नोव्हेंबर २०२४ या दिवशी चेन्नई येथे निषेध मोर्चा काढला. विविध हिंदु संघटनांच्या नेत्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि देशाच्या विविध भागांत, विशेषतः तमिळनाडूमध्ये ब्राह्मणांना भेडसावणार्‍या समस्यांविषयी भाषण केले. ‘हिंदू मक्कल कत्छी’चे नेते श्री. अर्जुन संपत आणि भाजपचे नेते, ‘पाटली मक्कल कत्छी’चे नेते यांनी त्यांचे विचार मांडले. या कार्यक्रमात भाजपचे नेते श्री. कारू नागराजन्, भाजपच्या नगरसेविका उमा आनंदन्, शिवाचार्य, बट्टाचार्य, अर्चक इत्यादी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये तमिळनाडू ब्राह्मण संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या कार्यक्रमात ब्राह्मणांवर होणार्‍या आक्रमणांच्या घटने निषेध करणारा ठराव संमत करण्यात आला, तसेच ब्राह्मण समाजाची अपकीर्ती करणार्‍यांविरुद्ध नागरी हक्क संरक्षण (पी.सी.आर्.) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी राज्यपालांकडे करण्यात आली.

या कार्यक्रमाला ५ सहस्रांहून अधिक लोक उपस्थित होते. यामध्ये ब्राह्मण समुदायातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सनातन संस्थेच्या वतीने पूज्य (सौ.) उमा रविचंद्रन्, श्री. नंदकुमार आणि श्री. जयकुमार या कार्यक्रमाला उपस्थित होते.