श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील सूक्ष्मातील वैशिष्ट्यांची तुलनात्मक सारणी

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘साधकांनो, श्री गुरूंनी एखादी सेवा दिल्यावर ‘ती पूर्ण करण्याचे सामर्थ्यही त्यांनी प्रदान केले आहे’, या निष्ठेने सेवेचा स्वीकार करा ! या निष्ठेमुळेच श्री गुरूंचे तत्त्व कार्यरत होऊन परिपूर्ण सेवा घडेल आणि त्यातून साधकांचा उद्धार होऊ लागेल !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘श्रीकृष्णाप्रमाणे ‘योगक्षेमं वहाम्यहम् ।’ ही उक्ती सार्थ करणारा ‘श्री जयंतावतार’ साधकांच्या जीवनरथाचे सारथ्य करणार आहे !’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’ च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.