Somnath Bulldozer Action : सोमनाथ (गुजरात) : सरकारी भूमीवरील मुसलमानांची ५० हून अधिक अवैध धार्मिक स्थळे भुईसपाट !

  • अवैध बांधकामांवर करण्यात आलेली ही देशस्तरावरील सर्वांत मोठी कारवाई !

  • कारवाई करतांना मोठ्या संख्येने मुसलमानांची उपस्थिती !

अवैध बांधकामांवर बुलडोझरद्वारे कारवाई

सोमनाथ (गुजरात) – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरात येथील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरापासून अवघ्या दीड कि.मी. अंतरावर असलेल्या सरकारी भूमीवर अवैध मशीद आणि अन्य धार्मिक स्थळे उभारण्यात आली होती. प्रशासनाने त्यांना भुईसपाट केले आहे. २७ सप्टेंबरला १०२ एकर क्षेत्रातील ५० हून अधिक अवैध धार्मिक स्थळे, इमारती आणि अन्य बांधकामांवर ३५ हून अधिक बुलडोझरद्वारे कारवाई करण्यात आली. अवैध बांधकामांवर करण्यात आलेली कारवाई ही देशातील सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.

उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉर प्रमाणे सोमनाथ येथेही कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. या अवैध बांधकामांना प्रशासनाने नोटीस बजावूनही ती हटवण्यात न आल्याने शेवटी प्रशासनाने स्वतः ही कारवाई केली. कारवाईच्या वेळी या ठिकाणी मोठ्या संख्येने मुसलमान जमा झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी १ सहस्र ४०० पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

सोमनाथ मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या सरकारी भूमीवर मागील अनेक वर्षांपासून अवैध बांधकामे करण्यात आली होती. (सरकारी भूमीवर अवैध बांधकामे होत असतांना प्रशासन झोपले होते का ? – संपादक) कारवाईच्या वेळी बुलडोझर, शेकडो ट्रॅक्टर आणि डंपर तैनात करण्यात आले होते.

काँग्रेसकडून अवैध बांधकामांच्या बचावाचा प्रयत्न !

कारवाई करण्यात आलेल्या या अवैध बांधकामाचा बचाव करण्याचा प्रयत्न करतांना गुजरात प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षा नुसरत पंजा यांनी म्हटले की, पाडलेल्या बांधकामाला ७०० ते ८०० वर्षांचा इतिहास असून जुनागढच्या नवाबाच्या कारकीर्दीत बांधकामाला विशेष संरक्षण होते. त्या वफ्क बोर्डाच्या मालमत्ता होत्या. जिल्हाधिकारी आणि सरकार यांनी न्यायालयाच्या वास्तू पाडण्याच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून कारवाई केली आहे.

संपादकीय भूमिका

मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या काँग्रेसकडून याहून वेगळी कोणती अपेक्षा करायची ?

नोटीस बजावूनही अवैध बांधकाम हटवले नाही ! – जिल्हाधिकारी डी.डी. जडेजा

या संदर्भात जिल्हाधिकारी डीडी जडेजा म्हणाले की, सोमनाथमधील हे अवैध अतिक्रमण खाली करण्यासाठी प्रशासनाकडून फार पूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर जागा रिकामी करण्यासाठी अधिकची मुदतही देण्यात आली होती; मात्र त्यानंतरही भूमी रिकामी करण्यात आली नाही. कारवाईला विरोध करणार्‍या १२० जणांना पोलिसांनी कह्यात घेतले.

सोमनाथमध्येही कॉरिडॉरच्या कामाला गती मिळण्याची शक्यता

सोमनाथ येथेही कॉरिडॉर बनवला जाणार आहे. यासाठी केंद्रशासनाकडून संमती मिळाली आहे. सोमनाथ मंदिराच्या विकासासाठी अनेक योजनांवर काम चालू आहे. अशा स्थितीत या कारवाईनंतर कॉरिडॉरच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारची कारवाई करणार्‍या भाजप शासनाचे अभिनंदन ! यापुढे अशा प्रकारची अवैध धार्मिक स्थळे उभारलीच जाणार नाहीत, असा वचक गुजरात शासनाने निर्माण केला पाहिजे, असे धर्मप्रेमी हिंदु जनतेला वाटते !