१. श्री. अरविंद उमाकांत बिरादार (धारकरी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), धनकवडी, पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘मला बर्याच वेळा अशाच पद्धतीचे अनुभव आले आहेत. आज हे प्रदर्शन पाहून सूक्ष्म जगताची प्रचीती आली.’
२. श्री. वैभव विजय कुलकर्णी (धारकरी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), धनकवडी, पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘समस्त हिंदूंना ‘सनातन संस्थे’च्या या सखोल मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे. योग्य परीक्षण आणि उपाययोजना या दृष्टीने समस्त हिंदू पुष्कळ अपेक्षेने संस्थेकडे पहातील.’
३. श्री. राहुल शंकरराव पोतदार (व्यावसायिक), हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र.
अ. ‘हे प्रदर्शन पाहून ‘अप्रतिम कार्य आहे’, असे मला वाटले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २५.६.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |