सौ. दीपाली देशमुख, पुणे, महाराष्ट्र.
‘प.पू. भक्तराज महाराज यांचे (प.पू. बाबांचे) छायाचित्र पहाता क्षणी मला ‘यांना कुठेतरी पाहिले आहे’, असे अकस्मात् आठवले. त्यांना नमस्कार केल्यावर माझ्या डोळ्यांतून पुष्कळ भावाश्रू येत होते; पण मी ते भावाश्रू आवरले. मी संपूर्ण परिसर पाहून आल्यानंतर प.पू. बाबांच्या छायाचित्राला नमस्कार केला. त्यानंतर चित्रपट जसा पुढे सरकतो, तसे सूक्ष्मातून अनेक देव (महालक्ष्मीदेवी, गणपति, तसेच गजानन महाराज) माझ्या डोळ्यांसमोर आले. मी गजानन महाराज यांची भक्त आहे. तेथून उठल्यानंतर मला पुन्हा रडू आले; पण मी ते आवरले. मला आश्रम दाखवत असलेल्या साधिकेला मी ही अनुभूती सांगितली. मला प.पू. बाबांच्या छायाचित्राकडे पाहून समाधान आणि शांती मिळाली.’
(सूत्रांचा दिनांक : २८.६.२०२४)
|