‘२३.८.२०२४ या दिवशी पू. सु.ग. शेवडेगुरुजी यांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी पू. दातेआजींविषयी सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. पू. शेवडेगुरुजी म्हणाले, ‘‘पू. आजींचा पूर्वीचा जन्म त्यांच्या मुक्तीसाठी होता. त्यांचे त्या जन्मात काहीतरी भोगायचे राहिले; म्हणून त्यांना हा जन्म मिळाला आहे. त्यांना पुष्कळ वेदना होत असणार. या जन्मात पू. आजी त्या वेदना भोगून संपवत आहेत. त्यांच्या वेदना लवकरच संपतील आणि त्या आता पूर्णपणे मुक्त होतील.’’
२. पू. आजींच्या आजारपणाविषयी सांगितल्यावर आणि त्यांची सद्यःस्थिती पाहिल्यावर पू. शेवडेगुरुजी म्हणाले, ‘‘पू. आजींसारखे उदाहरण मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी बघितले नाही. मी धन्य आहे !’’
३. त्यानंतर पू. शेवडेगुरुजी पुढे म्हणाले, ‘‘पू. आजी आणि तुम्ही (सगळे कुटुंबीय) पुष्कळ भाग्यवान आहात. तुम्हाला पू. आजींची सेवा करायला मिळत आहे.’’ हे सांगतांना त्यांचा भाव जागृत झाला होता.’
– सौ. ज्योती नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.८.२०२४)
‘प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षयः ।’, म्हणजे प्रारब्धकर्मांचे परिणाम हे भोगूनच संपवावे लागतात. ते कर्म भोगण्यानेच क्षय वा नाश होतो. – भारताचार्य पू. सु.ग. शेवडे |