संपादकीय : कर्नाटक शासनाचा गणेशद्रोह !

श्री गणेशमूर्ती पोलिसांनी कह्यात घेऊन आरोपींप्रमाणे पोलिसांच्या गाडीत ठेवली

ऐन गणेशोत्सवात कर्नाटक येथील मंड्या जिल्ह्यातील नागमंगल येथे ४ दिवसांपूर्वीच मुसलमानांनी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर दगड आणि पेट्रोलबाँब यांद्वारे आक्रमण केले. हिंदूंची दुकाने जाळून कोट्यवधी रुपयांची हानी केली. या वेळी उसळलेल्या दंगलीमध्ये हिंदूंची मोठ्या प्रमाणात हानी झाली. या घटनेच्या निषेधार्थ बेंगळुरू येथे हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन केले आणि या वेळी त्यांच्याकडे असलेली श्री गणेशमूर्ती पोलिसांनी कह्यात घेऊन आरोपींप्रमाणे पोलिसांच्या गाडीत ठेवली. म्हणजे आधी हिंदूंच्या सणामध्ये मुसलमान दंगल घडवतांना पोलीस निष्क्रीय राहिले आणि हिंदू रस्त्यावर उतरून आंदोलन करायला आल्यावर मूर्तीसह हिंदूंना पोलिसांच्या गाडीत ढकलून विरोधही करायचा नाही, अशी भूमिका घेतली आहे. हा काय प्रकार आहे ? ही कर्नाटक येथील काँग्रेसच्या सरकारची हिंदूंविरुद्ध मोगलाईच आहे. ऐन उत्सवाच्या काळात हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवणे, हिंदूंचे रक्षण न करणे, मुसलमानांनी दंगल चालू करूनही मुसलमानांसह हिंदूंवरही गुन्हे नोंद करणे, हिंदु युवकांना अटक करणे यांतून पोलीस आणि प्रशासन यांचा हिंदुद्वेष उघड होत आहे. ‘काँग्रेसचा हात म्हणजे मुसलमानांना साथ !’, असे समीकरण काँग्रेस केंद्रात सत्तेवर असतांना बनले होते. मुसलमानांना साहाय्य करण्यास, त्यांनी गुन्हा केला असल्यास, दंगल केली असल्यास त्यांच्यासह हिंदूंनाही सहआरोपी करण्यात येत असे, भले हिंदूंची चूक असो अथवा नसो ! हिंदू आणि मुसलमान यांच्यातील वाद, संघर्ष अथवा दंगल असो, काँग्रेसने नेहमी मुसलमानांची बाजू घेतली आहे. परिणामी हिंदू हे न्यायापासून वंचित राहिले असून एक प्रकारचे भय हिंदूंमध्ये काँग्रेसने निर्माण केले. त्याचे उदाहरण नागमंगल येथेही पहायला मिळत आहे. नागमंगल गावातील शेकडो हिंदुत्वनिष्ठ युवकांनी पोलिसांच्या अन्याय्य अटकेपासून वाचण्यासाठी गाव सोडून पलायन केले आहे. परिणामी ऐन उत्सवात श्री गणेशमूर्तीची पूजा करण्यासाठी कुणी तरुण उपलब्ध नाही. गावात केवळ वयोवृद्ध लोक उरले आहेत. पोलिसांवरील हा विश्वास (?) कशामुळे निर्माण झाला आहे ? पोलीस विशिष्ट हेतू ठेवून किंवा कुणा हिंदुद्वेष्ट्याच्या सांगण्यावरून कारवाई करत आहेत, हे हिंदुत्वनिष्ठ तरुणांना लक्षात आले आहे; मात्र काँग्रेसच्या राज्यातील पोलीस हिंदुद्वेषी असतात, हेसुद्धा सिद्ध होते.

कारागृहात हिंदु युवकांना जाणीवपूर्वक अनेक दिवस डांबून ठेवण्यात येईल. जामीन मिळण्यास अनेक दिवस किंवा महिने लागतील. अशा प्रकारे हिंदुत्वाचे कार्य करण्याविषयी त्यांच्यामध्ये भय निर्माण केले जाईल. ही पोलिसांची एकूणच हिंदुद्वेषी कार्यपद्धत आहे आणि काँग्रेसच्या राज्यातच निर्माण झालेली आहे. काँग्रेसच्या राज्यात ‘बहुसंख्यांकांना कायदा आणि अल्पसंख्यांकांना फायदा’, असेही समीकरण आहे.

पहिले सर्व आरोपी हिंदूच ?

भाजपचे आमदार बसवराज पाटील यत्नाळ यांनी आरोप केला आहे की, पोलिसांनी आरोपी क्र. १ ते २३ पर्यंत सर्व हिंदूंची नावे नोंदवली आहेत. असे कसे होऊ शकते ? मुख्य म्हणजे आरोपी क्रमांक १ म्हणजे मूर्तीची प्रतिष्ठापना करणारा गणेशभक्तच आहे. हे तर पुष्कळच अन्यायकारक आहे. यातून पोलिसांचा हिंदूंनी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यालाही विरोध आहे, म्हणजेच हिंदूंच्या धर्माचरणालाच विरोध आहे, हे लक्षात येते. असे पोलीस असणार्‍या काँग्रेसच्या राज्यात हिंदू सण-उत्सव कसे साजरे करू शकतील ? हिंदूंनी भयाच्या सावटाखालीच रहाणे काँग्रेसला अपेक्षित आहे का ? श्री गणेशमूर्ती बसवली म्हणून गुन्हा नोंद होणे, हा तर मोगलाईहून भयावह काळ झाला. ‘काँग्रेसचे विसर्जन केले पाहिजे’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायचे. ते होणे का आवश्यक आहे ? ते येथे लक्षात येते.

आता मुख्य गोष्ट म्हणजे मंड्यातील नागमंगल या ठिकाणी मागील वर्षीही दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र पोलिसांनी ती घटना एकतर दाबली किंवा परिस्थिती हाताळून बाहेर येऊ दिली नाही. म्हणजे खरेतर मागील वर्षीपासून तेथील मुसलमानांनी गडबड करण्यास प्रारंभ केला आहे, तर यावर्षी पोलिसांनी अधिक सतर्कता आणि सावधानता बाळगणे आवश्यक होते. ते पोलिसांनी न करता दंगल भडकू दिली. हिंदूंच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची हानी होऊ दिली. घटनेनंतर काही दिवसांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी ‘दंगल हाताळण्यास पोलीस चुकले आहेत,’ याची स्वीकृती दिली आहे. पेट्रोलबाँब, तलवारी यांचा दंगलीत उपयोग होतो, धर्मांधांचा जमाव एकदम येतो; म्हणजे ही दंगल पूर्वनियोजित होती, हे तर स्पष्ट होते; मात्र पोलिसांना ते का लक्षात आले नाही ? पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले कि जाणीवपूर्वक काही करण्याचे टाळले, हे हिंदूंना समजले पाहिजे. एका पोलीस अधिकार्‍याचे निलंबन करून हिंदूंमध्ये निर्माण झालेली भीती न्यून होणार का ? हिंदूंच्या संपत्तीची हानी भरून निघणार का ? पोलिसांची ही केवळ काहीतरी करतो म्हणून दाखवण्यासाठी केलेली कृती आहे. काँग्रेसच्या आशीर्वादाने दंगलखोर धर्मांध निवांत, तर दंगल सहन करणारे हिंदू हवालदिल आहेत ! दुकान आणि त्यातील साहित्य जाळल्यामुळे कोट्यवधी रुपयांची हानी झालेल्या हिंदूंपुढे ‘आता सर्व कसे उभारायचे ?’, हा प्रश्न आहे. ‘आम्ही कसेबसे आमचे प्राण वाचवले. शेकडो जणांपुढे दुकान कसे वाचवायचे ? हे संकट होतेच !’, असे एका हिंदु दुकानदाराने सांगितले. हिंदूंच्या मोठ्या धार्मिक सणामध्ये मुसलमान सहजतेने उपद्रव निर्माण करू शकतात; म्हणजे त्यांना त्यांच्यावर काहीही कारवाई होणार नाही, याची निश्चिती आहे. अशीच मोकळीक मुसलमानांना काँग्रेसशासित अन्य राज्यांमध्ये आहे. त्यामुळे तेथे केवळ दंगली घडवणेच नाही, तर अनधिकृत मशीद, मदरसे उभारणे, लँड जिहाद करून सरकारी आणि सार्वजनिक भूमी कह्यात घेणे, हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करणे, मंदिरासमोर गोमांसाचे तुकडे फेकणे, लव्ह जिहाद करणे, हिंदूंच्या सण-उत्सवांमध्ये गोंधळ घालणे, असे प्रकार ते करतच असतात.

प्रखर हिंदुत्वनिष्ठ डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी याविषयी सांगितले की, मला पुरावे दिल्यास या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयात लढा देईन. हिंदूंच्या बाजूने आवाज उठवणारे डॉ. स्वामी हिंदूंना आदर्शवत् आहेतच; मात्र मिरवणुकीवरील आक्रमणाविषयी पुरो(अधो)गामी गप्प कसे बसले ? मुसलमानांविषयी कुठे खुट्ट असे झाले, तरी भावना दुखावणारे आणि भारतात मुसलमान असुरक्षित आहेत, असे सांगणारे आता कुठल्या बिळात लपले आहेत ? हेच मुसलमानांच्या मिरवणुकीत हिंदूंकडून काही झाले असते, तर अगदी ‘ओआयसीस’ या जागतिक स्तरावरील मुसलमानांच्या संघटनेने भारतावर टीका केली असती. हाच काँग्रेसचाही निधर्मीपणा किंवा सर्वधर्मसमभावीपणा आहे ! अशी काँग्रेस भारतातील काही राज्यांमध्ये सत्तेवर असणे, ही हिंदूंसाठी धोक्याची स्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणे, हेच हिंदूंच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे.

हिंदूंच्या धार्मिक उत्सवात मुसलमानांना हैदोस घालण्यापासून रोखू न शकणारे काँग्रेसचे सरकार विसर्जित करणे आवश्यक !