Shri Ramlalla Darshan : ६ महिन्यांत ११ कोटी भाविकांनी घेतले श्री रामललाचे दर्शन !

अयोध्या – जानेवारी २०२४ ते जून २०२४ या ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये ११ कोटी भाविकांनी श्री रामललाचे दर्शन घेतले. उत्तरप्रदेशच्या पर्यटन विभागाने ही आकडेवारी घोषित केली आहे. विशेष म्हणजे वर्ष २०२३ मध्ये उत्तरप्रदेशमध्ये आलेल्या पर्यटकांच्या संख्येपेक्षा या ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये आलेल्या पर्यटकांची संख्या अधिक आहे, असे उत्तरप्रदेशाच्या पर्यटन विभागाने म्हटले आहे.

१. उत्तरप्रदेशमध्ये वर्ष २०२४ च्या पहिल्या ६ महिन्यांमध्ये ३२ कोटी ९८ लाख पर्यटकांनी भेट दिली होती. मागील वर्षी याच कालावधीमध्ये १९ कोटी ६० लाख पर्यटकांनी भेट दिली होती.

२. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या पहिल्या ६ महिन्यांमध्ये १३ कोटी ३८ लाख पर्यटक अधिक आले आहेत. विदेशी पर्यटकांनी वाराणसी आणि आगरा येथील ताजमहाल यांना विशेष पसंती दिली आहे, असेही समोर आले आहे.

३. यावर्षी ७ लाखांहून अधिक विदेशी पर्यटकांनी आगरा येथील ताज महालला भेट दिली, तर १ लाख ३३ सहस्र पर्यटकांनी वाराणसी शहराला भेट दिली.

४. एकूण ४८ कोटी पर्यटकांनी उत्तरप्रदेशातील विविध स्थळांना भेटी दिल्या आहेत, अशी माहिती राज्य पर्यटनमंत्री जयवीर सिंह यांनी दिली.