उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. सन्निधी शेणै ही या पिढीतील एक आहे !
भाद्रपद शुक्ल नवमी (१२.९.२०२४) या दिवशी कु. सन्निधी हरीश शेणै हिचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आजी (आईची आई) श्रीमती सुधा के. कामत यांना जाणवलेली सन्निधीची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
कु. सन्निधी शेणै हिला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. धर्माचरणाची आवड असणे
सन्निधीला देवपूजा करणे, देवळात जाणे आणि देवाला प्रार्थना करणे इत्यादी कृती करायला आवडतात. तिला सात्त्विक पोशाख घालायलाही आवडते.
२. मिळूनमिसळून रहाणे
पूर्वी सन्निधी एकटी असायची. ती कुणाशीही जुळवून घेत नसे. मागील तीन वर्षांपासून मात्र तिला सर्वजण आवडू लागले आहेत. ‘सर्वांनी घरी यावे आणि रहावे’, असे तिला वाटते.
३. साधनेची सूत्रे तत्परतेने कृतीत आणणे
अ. सन्निधीचे मोठे मामा (आईचे चुलतभाऊ) श्री. गणेश कामत हे सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. ते शिवमोग्गा येथे आले की, मुलांना धर्माचरण, नीतीकथा आदींविषयी सांगतात. सन्निधी ते ऐकून घेऊन त्याप्रमाणे कृती करते.
आ. सन्निधी बालसंस्कार वर्गाला जाते. तेथे ‘कुंकू लावण्याचे महत्त्व, देवळात गेल्यावर पहिल्या पायरीला नमस्कार का करावा ?’, अशी सूत्रे सांगितली जातात. सन्निधी या सर्व गोष्टींचे पालन करते.
इ. दोन आठवड्यांपूर्वी सन्निधीला सांगितले होते की, ‘काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. त्यामुळे त्रास होतो.’ ही गोष्ट तिने ऐकली, तसेच लगेच ती इतरांनाही सांगण्याचा प्रयत्न केला.
४. श्रीकृष्णाची मालिका पहातांना स्वतः ‘राधा’ होणे !
सन्निधी दूरचित्रवाहिनीवर ‘राधा-कृष्ण’ मालिका पाहून स्वतः राधा होऊन राधेसारखे कपडे घालते आणि गाणीही म्हणते. एकदा मालिकेत कृष्णाला त्रास झाल्याचे पाहून ती रडली.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती भाव
सन्निधीच्या मनात गुरुदेवांप्रती पुष्कळ प्रीती आहे. एकदा ती मला म्हणाली, ‘‘तू मला गुरुदेवांना केवळ छायाचित्रातूनच दाखवले आहेस. तू मला प्रत्यक्षात गुरुदेवांचे दर्शन घडवणार नाहीस का ?’’ मी तिला म्हणाले, ‘‘आपण एकदा गोव्यातील रामनाथी आश्रमात जाऊ. तेव्हा मी तुला गुरुदेव प्रत्यक्ष दाखवीन.’’
६. सन्निधीकडून काही चूक झाल्यास ती तत्परतेने क्षमायाचना करते.
– श्रीमती सुधा के. कामत (आईची आई), शिवमोग्गा, कर्नाटक. (१७.५.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.