आळंदी (जिल्हा पुणे) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीचे दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ सप्टेंबर या दिवशी घेतले. या वेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे, देवस्थान प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने ज्ञानभूमी प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात १३० कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा, तसेच ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘तुकाराम गाथा’ छपाईसाठी देहू आणि आळंदी संस्थानला प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी प्राप्त व्हावा, यासाठीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > ज्ञानभूमी प्रकल्पाच्या निधीसाठी आळंदी देवस्थानचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
ज्ञानभूमी प्रकल्पाच्या निधीसाठी आळंदी देवस्थानचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
नूतन लेख
- कसई येथील श्री सातेरीदेवी मंदिर परिसरातील अन्य धर्मियाचा कक्ष काढायला हिंदुत्वनिष्ठांनी भाग पाडले
- अहमदनगर जिल्ह्यातील ‘नेवाशा’चे नामांतर ‘ज्ञानेश्वरनगर’ करा ! – डॉ. करणसिंह घुले, समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष
- देवद गाव येथे पार पडली श्री दुर्गामाता दौड !
- उधार मागणार्या विक्रेत्याच्या तोंडावर उकळता चहा फेकला !
- पुणे येथे शाळेच्या आवारात मुलावर अत्याचार !
- पुणे येथे पुन्हा एकदा ‘हिट अँड रन’ प्रकरणी दुचाकीस्वाराचा मृत्यू !