|
उडुपी (कर्नाटक) – जिल्ह्यातील प्रतिष्ठित महाविद्यालयात एम्.बी.बी.एस्. चे शिक्षण घेणार्या एका हिंदु विद्यार्थिनीवर तिच्याच महाविद्यालयातील मुसलमान प्रियकराने इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला. तो एम्.डी.चे शिक्षण घेतो. यावर तरुणीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. यावर हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गावाहिनी-मातृशक्ती संघटनेने पोलीस आयुक्त डॉ. अरुण यांना निवेदन देऊन केली.
A fanatical MD student traps an MBBS student in the web of Love Jih@d.
📍Udupi, Karnataka
The woman complains about attempts to convert her.
This incident once again proves that no matter how highly educated a Mu$|!m is, their religious fanaticism does not diminish the… pic.twitter.com/ukva078AUI
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 6, 2024
सदर तरुणी बाहेरच्या राज्यातील असून महंमद दानिश खान या विद्यार्थ्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. दानिशने तिचा लैंगिक छळही केला होता. तो तिला मारहाण करत असे. पुढे तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यास बळजोरीही करत.
विहिंपची ही आहे मागणी !
विहिंपच्या दुर्गावाहिनी-मातृशक्ती संघटनेच्या हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशभरात हिंदु मुलींना लक्ष्य करून प्रेमाच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा एक संघटित कट चालू आहे. अशा प्रकारे धर्मांतर केलेल्या मुलींना राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये वापरल्याचे अनेक प्रकरणांमध्ये समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणातही अशाच प्रकारचा कट आणि राष्ट्रविरोधी संघटकांचा हात असल्याचा संशय आहे. म्हणूनच हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘एन्.आय.ए.’कडे) सोपवावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. जिल्हा मातृशक्ती प्रमुख पूर्णिमा सुरेश, विहिंप जिल्हा सचिव दिनेश मेंडन, शहर मातृशक्ती प्रमुख गीता रवी शेट इत्यादी आदी नेते या वेळी उपस्थित होते.
संपादकीय भूमिका
|