Rajasthan : कोटा (राजस्‍थान) येथे शिवमंदिरातील शिवलिंग तोडले !

आरोपींना अटक करण्‍याची शिवभक्‍तांची मागणी

रामगंजमंडी

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

कोटा – जिल्‍ह्यातील रामगंजमंडी येथील सरकारी विहीर चौकात असलेल्‍या शिवमंदिरात २७ ऑगस्‍ट या दिवशी तुटलेले शिवलिंग सापडले. मंदिरातील या घटनेमुळे शिवभक्‍तांनी तीव्र संताप व्‍यक्‍त केला आहे. शिवभक्‍त आणि हिंदु संघटना यांनी आरोपींना अटक करून त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करण्‍याची मागणी केली आहे. (मंदिरातील शिवलिंगाची तोडफोड होणे, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्‍जास्‍पद ! – संपादक)

रामगंजमंडी शहर बंद करण्‍याची चेतावणी !

दोषींना लवकर पकडले नाही, तर रामगंजमंडी शहर बंद पाडू, अशी चेतावणी संतप्‍त हिंदूंनी प्रशासनाला दिली आहे. या घटनेनंतर शिवभक्‍त आणि हिंदु संघटनांचे सदस्‍य यांनी आंदोलन छेडले आहे. पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पारीक यांनी घटनास्‍थळी पोचून आंदोलकांना समजावण्‍याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासन आरोपीला पकडून कडक शिक्षा देईल. तोपर्यंत आंदोलन मागे घ्‍यावे, असे आवाहन त्‍यांनी केले.

संपादकीय भूमिका

राजस्‍थानमध्‍ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्‍या मंदिरांवर असे आक्रमण होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने अशा हिंदूद्वेष्‍ट्यांवर वचक निर्माण करणे आवश्‍यक !