चि. अर्जुन विनय बिरारी याला पाचव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
चि. अर्जुन विनय बिरारी याचा २५.८.२०२४ (श्रावण कृष्ण सप्तमी) या दिवशी तिथीने वाढदिवस आहे. त्याच्या आजीला त्याच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. जन्म ते १ वर्ष
१ अ. श्रीकृष्णाचा पाळणा ऐकायला आवडणे : ‘अर्जुन लहानपणापासूनच डोळे मिटून शांतपणे श्रीकृष्णाचा पाळणा ऐकत असे. आतापर्यंत त्याला झोपतांना श्रीकृष्णाचा पाळणा ऐकायला आवडत असे. आता तो स्वतःच श्रीकृष्णाचा पाळणा लावायला सांगून झोपतो.
१ आ. सनातनच्या ॐ चैतन्य वाहिनीवरील रामरक्षा स्तोत्र ऐकल्यावर शांतपणे झोपणे : तो १२ दिवसांचा असल्यापासून प्रत्येक रात्री रामरक्षा स्तोत्र ऐकत होता. एकदा त्याच्या आईने ‘यू ट्यूब’वर वेगवेगळ्या चालींतील रामरक्षा स्तोत्र लावून त्याच्या जवळ ठेवले. तेव्हा तो अस्वस्थ होऊ लागला. सनातनच्या ॐ चैतन्य वाहिनीवरील रामरक्षा स्तोत्र लावल्यावर तो शांतपणे झोपला.
१ इ. देवाची आवड : तो ४ मासांचा असतांना आम्ही मैसूरजवळ असलेल्या श्रीविष्णु मंदिरात गेलो होतो. तेथील पुजारी आम्हाला तेथील देवतांविषयी माहिती सांगत असतांना तो लक्ष देऊन ऐकत होता. तसेच तो ‘ऑनलाईन’ नामजप सत्संगातील श्रीकृष्णाचा श्लोक लक्ष देऊन ऐकतो.
२. वय १ ते ३ वर्षे
२ अ. भक्तीसत्संग ऐकणे : गुरुवारी भक्तीसत्संग आणि त्याची झोपायची वेळ एकच असते; पण आम्ही भ्रमणभाषवर भक्तीसत्संग लावल्यावर ‘तो एकाग्रतेने भक्तीसत्संग ऐकत आहे’, असे मला वाटते.
२ आ. नम्रता : तो देव आणि मोठ्या माणसांना आम्ही सांगितल्याप्रमाणे हात जोडून नमस्कार करतो.
२ इ. संतांप्रती भाव : २.१.२०२२ या दिवशी आम्हाला पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा) यांचा सत्संग लाभला. तेव्हा त्याने त्यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. पू. अण्णांनी त्याला दिलेला खाऊ त्याने प्रसाद म्हणून स्वीकारला. आम्ही पू. अण्णांशी बोलत असतांना तो शांतपणे सर्व ऐकत होता.
२ ई. देव आणि गुरु यांच्याप्रती भाव : ‘तो दोन्ही हात जोडून नमस्कार मुद्रेत हनुमंताकडे बघत असतो. तेव्हा त्याच्यात दास्यभाव आहे’, असे मला जाणवते. एखादे मंदिर दिसल्यास ‘बाबा, गाडी थांबव. आपण मंदिरात जाऊ. तेथे देव आहे’, असे तो सांगतो. तो श्रीकृष्ण आणि परम पूज्य गुरुदेवांच्या छायाचित्रांकडे एकटक बघतो. ‘श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शन चक्र फिरत आहे’, असे तो सांगतो. त्याला श्रीकृष्णाशी बोलायला आवडते. तो घरातील सर्व गोष्टी श्रीकृष्णाला सांगत असतो. प.पू. भक्तराज महाराज आणि श्रीकृष्ण यांचा जयजयकार केल्यावर तो दोन्ही हात वर उचलतो. तेव्हा त्याच्या चेहर्यावर शांतता आणि कृतज्ञताभाव दिसतो.
३. वय ३ ते ५ वर्षे
३ अ. श्लोक म्हणणे : सकाळी उठल्यावर तो हात जोडून ‘कराग्रे वसते लक्ष्मी…’ हा श्लोक म्हणतो. त्याला अंघोळ करतांना श्लोक म्हणणे आवडते.
३ आ. सूक्ष्मातील कळणे : एकदा आम्ही चारचाकी गाडीने बाहेर गेलो होतो. तेव्हा पाऊस पडू लागला. आम्ही पुढे जात असतांना अर्जुनने त्याच्या वडिलांना ‘पुढे जाऊ नका’, असे सांगितले. पाहिले, तर पुढे एक मोठा खड्डा असल्याचे आम्हाला दिसले आणि आमची गाडी थांबली. तेव्हा गाडीचे एक चाक खड्ड्यात अडकले होते. तेव्हा ‘त्याने पुढे येणार्या संकटाची जाणीव करून दिली होती’, असे मला वाटले.
– श्रीमती भारती सतीश बिरारी (आजी), बेंगळुरू (१५.५.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या http://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.