मेडिकव्हर रुग्णालयाचे धमकीच्या ‘ई-मेल’कडे दुर्लक्ष !
छत्रपती संभाजीनगर – राज्यस्थान राज्यातील ५० रुग्णालये उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल १७ ऑगस्ट या दिवशी आल्याने महाराष्ट्र राज्यात रुग्णालयांची पोलिसांनी पडताळणी केली. या अनुषंगाने चिश्तिया चौकाजवळील मेडिकव्हर रुग्णालय बाँबने उडवण्याची धमकी देणारा एक ई-मेल रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला होता. त्यात रुग्णालयामधील सर्वांना ठार मारले जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे; मात्र रुग्णालय प्रशासनाने १ दिवस विलंबाने ई-मेल पाहून त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अडीच घंटे पोलिसांनी बाँबचा शोध घेतला. रुग्णालयात काहीही आक्षेपार्ह वस्तू नसल्याचे निष्पन्न झाल्यावर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
संपादकीय भूमिका :वारंवार बाँबच्या मिळणार्या धमक्या हा पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण ! |