बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता !
मुंबई, १८ ऑगस्ट (वार्ता.) – मागील आठवड्यात भांडुप येथे आधारकार्ड काढण्यासाठी आणि आधारकार्डामध्ये काही पालट करण्यासाठी १ दिवसाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात आधारकार्डमध्ये पालट करण्यासाठी ४ मुसलमान आले होते; मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यांच्याकडे पूर्ण पत्ता असलेल्या पुराव्यांची मागणी केल्यावर त्यांना ती देता आली नाहीत. आधारकार्ड केंद्रावरील व्यक्तीने याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला माहिती देऊन हे मुसलमान बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला.
आधारकार्ड केंद्रावर आलेल्या मुसलमान व्यक्तींनी निवासाचा पुरावा म्हणून वीजदेयक आणले होते. त्यावर महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचा रबरस्टँप शिक्का मारण्यात आला होता, तसेच त्यावर पूर्ण पत्ताही नव्हता. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे वीजदेयक छापील असते; मात्र त्यांच्या वीजदेयकावर शिक्का मारला होता. आधारकार्ड केंद्रावरील व्यक्तीला संशय आल्याने त्यांनी पूर्ण पत्ता असलेला पुरावा मागितला; परंतु त्यांना तो देता आला नाही.