बांगलादेशामध्ये हिंदूंच्या संरक्षणार्थ सैन्य घुसवा ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

सांगली येथील हिंदु एकता आंदोलनाच्या निषेध सभेत मागणी !

निषेध सभेत उपस्थित असलेले जिज्ञासू आणि बोलतांना श्री. नितीन शिंदे

सांगली, १५ ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशात स्वतंत्र हिंदु राष्ट्र बनवा; वेळ पडल्यास बांगलादेशामध्ये हिंदूंच्या संरक्षणार्थ सैन्य घुसवा. हिंदूंनो, जागे व्हा, बांगलादेशातील हिंदूंची मंदिरे आणि घरांवरील आक्रमणे, हिंदु बंधू-भगिनींचा नरसंहार त्वरित थांबवा. भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना देशातून हाकलून लावा, असे आवाहन हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केले. हिंदु एकता आंदोलन आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने शहरातील मारुति चौक येथे  ‘निषेध सभे’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी बांगलादेशाचा ध्वज जाळून हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात निषेध केला. या वेळी हिंदु एकता आंदोलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी आमदार श्री. नितीन शिंदे म्हणाले की, भारतामध्ये अनधिकृतपणे घुसखोरी केलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना सरकारने शोधून काढून त्यांना देशाबाहेर हाकलून लावावे, अन्यथा हिंदुत्वनिष्ठ अन् शिवभक्त यांना हे काम करावे लागेल. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री संजय धामणगावकर, प्रदीप बोथरा, अविनाश मोहिते, स्वप्नील शहा आणि मनोज साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.

संपादकीय भुमिका

भारतात घुसखोरी केलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना हाकलण्यासाठी सरकार कधी प्रयत्न करणार ?