जहानाबाद (बिहार) येथील घटना
जहानाबाद (बिहार) – येथील बाबा सिद्धनाथ मंदिर परिसरात ११ ऑगस्टच्या रात्री झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ७ भाविकांचा मृत्यू झाला, तर ३५ जण घायाळ झाले.
या घटनेविषयी एका व्यक्तीने सांगितले की, प्रशासनाने मंदिरातील गर्दीचे नियोजन केले नाही, तसेच येथे पुरेशी सुरक्षाव्यवस्था नव्हती. काही लोकांनी मला सांगितले की, प्रशासनाने एन्.सी.सी.मधील तरुणांना सुरक्षा आणि येथील व्यवस्था पहाण्यासाठी तैनात केले आहे; मात्र त्यांनी भाविकांवर लाठीमार केला. ज्यामुळे भाविक धावपळ करू लागले. त्यातून मोठा गोंधळ उडाला आणि ही चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. या सगळ्यात प्रशासनाचीच चूक आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मंदिराच्या बाहेर फुले विकणार्या फेरीवाल्याचे भांडण चालू होते. त्या वेळी लाठीमार केला गेला. त्यातून लोक सैरावैरा धावू लागले आणि ही चेंगराचेंगरीची घटना घडली. ही चेंगराचेंगरीची घटना घडत असतांना पोलीस आणि प्रशासन उपस्थित नव्हते. पोलिसांच्या दायित्वशून्यतेमुळेच ही घटना घडली आहे.
संपादकीय भूमिकामंदिरांच्या ठिकाणी होणार्या चेंगराचेंगरीच्या घटना का थांबत नाहीत ? प्रशासन आणि पोलीस निष्क्रीय का रहातात ? |