Palestinian Flag Waved : उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांत मोहरमच्या मिरवणुकीत फडकावले पॅलेस्टिनी झेंडे !

लूटमार, दगडफेक आणि मारामारीच्या घटना !

मोहरमच्या मिरवणुकीत फडकावले पॅलेस्टिनी झेंडे

पाटलीपुत्र (बिहार) – उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांत मोहरमच्या मिरवणुकींत  पॅलेस्टिनी झेंडे फडकावले जाण्यासह दगडफेक, मारामारी आणि लुटमार इत्यादी घटना घडल्याचे समोर आले. त्यामुळे उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये, तर बिहारमधील पाटलीपुत्र, मुझफ्फरपूर आणि मोतिहारी येथे तणाव निर्माण झाला. पाटलीपुत्र येथील मिरवणुकीत सहभागी झालेल्या धर्मांधांनी येथील एका दुकानदाराला मारहाण करून त्याचे दुकान लुटल्याचा आरोप आहे. मुझफ्फरपूरमध्ये मिरवणुकीतील ‘डीजे’ जप्त केल्याने संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. मोतिहारीमध्ये मिरवणुकीत पॅलेस्टिनी ध्वज फडकवण्यात आला. कानपूरमध्येही मिरवणुकीत लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे.

१. मोहरमच्या मिरवणुकींमुळे अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोहरमचा सण बंधुभावाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

२. मिरवणुकीच्या वेळी लूटमार आणि हाणामारी करणार्‍या काही जणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. मिरवणुकीच्या निमित्ताने गोंधळ घालणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक भानुप्रताप सिंह यांनी सांगितले.

३. बिहारमधील मोतिहारी येथे मोहरमच्या मिरवणुकीत पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावण्यात आला आणि इस्रायली सैन्याच्या आक्रमणाचा निषेध करण्यात आला. पोलिसांनी या धर्मांधांना रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप होत आहे.

संपादकीय भूमिका

  • जेथे पाकिस्तानचे आणि इसिस या आतंकवादी संघटनेचे झेंडे फडकावणार्‍यांवर कारवाई होत नाही, तेथे पॅलेस्टिनी झेंडे फडकावणार्‍यांवर काय कारवाई होणार ?
  • मोहरमनिमित्त मिरवणुका नियोजित असतांनाही त्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरणे, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !