नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने ‘घटस्फोटित मुसलमान महिलेला तिच्या पतीकडून पोटगी मिळण्याचा अधिकार आहे, त्यासाठी ती याचिका प्रविष्ट (दाखल) करू शकते’, असा निर्णय दिला.
सर्वोच्च न्यायालयाने मुसलमान तरुणाची याचिका फेटाळतांना म्हटले की, मुसलमान महिला (घटस्फोटावरील हक्कांचे संरक्षण) कायदा, १९८६ धर्मनिरपेक्ष कायद्याला बगल देणार नाही. भारतीय दंड संहितेचे कलम १२५ केवळ विवाहित महिलांनाच नाही, तर सर्व महिलांना लागू होईल, या निष्कर्षासह आम्ही याचिका फेटाळत आहोत.
संपादकीय भूमिकाहे परत परत का सांगावे लागत आहे ? शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असाच निर्णय दिला होता. केंद्र सरकारने याकडे लक्ष देऊन कायद्यात किंवा राज्यघटनेत याविषयी अडथळे असतील, तर ते दूर केले पाहिजेत ! |