साम्यवाद्यांचा समकालीन हिंदुविरोधी प्रचार !

‘हिंदुस्थानात शांत, समृद्ध जीवन जगायचे असेल, तर सर्व मुसलमानांना पाकिस्तानात पाठवून द्या’, असे आंबेडकरवादी नेते म्हणतील का ?

२४ जून २०२४ या दिवशीपासून श्री रामनाथ देवस्थान, गोवा येथे चालू होत असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने…

१. ‘साम्यवादी’ विचारसरणीचा भारतात प्रभाव कसा वाढला ?

डॉ. एस्.आर्. लीला

साम्यवादी किंवा वामपंथी हे देशासाठी इतके नकारात्मक आहेत की, आपण त्यांच्याविषयी बोलण्यासारखे काहीच नाही. राष्ट्रहितासाठी त्यांचे योगदान इतके भयंकर आणि अत्यंत दुःखदायी असल्यामुळे त्यांच्याविषयी बोलण्याची आवश्यकता नाही; परंतु या मार्क्सवाद्यांच्या प्रभावाचे अत्यंत वाईट परिणाम आपण भोगत आहोत. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलणे आणि त्यांच्याविषयी जाणून घेणे आवश्यक ठरते. वर्ष १८४८ मध्ये लंडनस्थित जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स याने त्याचा मित्र फ्रेडरिक एंजल्स याच्या साहाय्याने ‘कम्युनिस्ट’ (साम्यवादी) घोषणापत्र लिहिले, म्हणजे कार्ल मार्क्स भारतात कधी आलाच नव्हता. त्याला जगाच्या घडामोडींची माहिती नव्हती. त्याने स्वतःच्याच दृष्टीकोनातून संपूर्ण जगाचा विचार केला आणि ही विचारसरणी लिहिली. त्या काळच्या परिस्थितीमुळे ही विचारसरणी अत्यंत लोकप्रिय झाली; मात्र ती फार काळ टिकू शकली नाही. वर्ष १९८० मध्ये रशिया, पोलंड, हंगेरी यांसारखे प्रखर ‘साम्यवादी’ देश फुटले. ‘सोव्हिएत रशिया’चे अनेक भाग झाले आणि साम्यवाद संपला; मात्र तो चीनमध्ये आहे.

२. भारतीय ‘साम्यवादी’ आणि चिनी ‘साम्यवादी’ यांच्यातील भेद

भारतीय ‘साम्यवादी’ आणि चिनी ‘साम्यवादी’ यांच्यात भेद आहे. आजही चीनवर तेथील ‘साम्यवादी’ पक्षाची सत्ता आहे. चिनी संस्कृती, त्यांचा इतिहास, त्यांची भाषा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये साम्यवाद रुजलेला आहे, उदा. चिनी तत्त्ववेत्ता ‘कन्फ्युशस’ याची शिकवण तेथील लोकांना शिकवली जाते. भारतातील साम्यवाद मात्र या सर्व गोष्टींच्या विरोधात आहे. येथे वेदांत प्रणाली किंवा दर्शन प्रणाली यांचा प्रसार करणार्‍या एखाद्या आचार्याचे नाव जरी उच्चारले, तरी जातीयवादी ठरवले जाते, तसेच आपण सहस्रो वर्षे मागे जात असून देशाला प्रतिगामी गतीने नेत असल्याची ओरड केली जाते. त्यासाठीच डॉ. आंबेडकर यांनी साम्यवादाला ‘वणवा’ असे म्हटले आहे. वणवा कोणत्याही गोष्टीचा आणि त्याच्या मार्गात येणार्‍या प्रत्येक गोष्टीचा नाश करतो. वणवा, म्हणजे अग्नी नव्हे.

‘ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् ।’
(ऋग्वेद, मण्डल १, सूक्त १, ऋचा १)

अर्थ : ‘अग्नी हा यज्ञाचा अग्रणी आहे. यज्ञाचा प्रमुख देव तोच आहे.’

३. भारतीय साम्यवादी पक्षाचा देशावरील निकृष्ट परिणाम

साम्यवाद हा ‘वणवा’ आहे. ‘साम्यवादी’ (कम्युनिस्ट) पक्षाच्या प्रभावामुळे भारतात त्या पक्षाचे सर्वांत वाईट अनुयायी निर्माण झाले. साम्यवादी विचारसरणीचा भारतीय आचार आणि विचारसरणी यांवर वाईट आणि धक्कादायक परिणाम झाला आहे. स्वामी विवेकानंद यांच्याप्रती आम्हा सर्वांच्या मनात नितांत आदर आहे. एक हिंदु संन्यासी म्हणून ते जगभर गाजले. गेल्या शतकाच्या शेवटी हिंदु संस्कृती आणि हिंदु तत्त्वज्ञान यांना आवश्यक असलेली प्रेरणाशक्ती देणारे स्वामी विवेकानंदच होते. त्यांनी हिंदु धर्म आणि हिंदु तत्त्वज्ञान यांतील उदात्त सिद्धांत, हिंदु धर्मातील वैश्विक सत्य संपूर्ण जगाला अवगत करून दिले; परंतु दुर्दैव असे की, बंगालमध्ये स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठातील लोकांना बळजोरीने ‘आम्ही हिंदु नसून अल्पसंख्यांक आहोत’, असे म्हणायला भाग पाडले; ‘अन्यथा त्यांची मालमत्ता सरकारद्वारे कह्यात घेतली जाईल’, असे सांगण्यात आले. हिंदू बहुसंख्य असले, तरीही त्यांना मालमत्तेचा अधिकार नाही. त्यामुळे स्वामी विवेकानंदांसारख्या एका श्रेष्ठ हिंदु आध्यात्मिक गुरूंनी आरंभलेल्या रामकृष्ण मठाला ‘हिंदु’ नाही, तर ‘अल्पसंख्यांक’ म्हणून ओळख निर्माण करण्यास भाग पाडले. ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षा’चा हा सर्वांत वाईट परिणाम आहे.

४. साम्यवादी विचारसरणीमुळे आधुनिक भारतात सहस्रो हत्याकांडे होणे

साम्यवाद हा भारत आणि भारतियांवर लादला गेला. आज त्याचे अस्तित्व कुठेही नाही. पूर्वी ते बंगालमधील कोलकाता आणि केरळ येथील कालिकत येथे होते. आता ते कालिकत, कन्नूर आणि इतर ठिकाणी असून त्या ठिकाणी अजूनही ते राज्य करत आहेत. आपण जागतिक शहरांविषयी बोलतो; मात्र त्यांचे बोलणे अंशतः गावांविषयी असते. तेथील प्रत्येक गावावर साम्यवादी ‘कम्युनिस्ट’ पक्षाचे नियंत्रण आहे. साम्यवादाच्या व्यतिरिक्त कोणताही मनुष्य किंवा विचारसरणी यांना तेथे थारा नाही. साम्यवाद सोडून बोलणारी एकही व्यक्ती त्यांच्या गावात पाय ठेवू शकत नाही. तसे केल्यास त्यांना त्वरित संपवण्यात येते. केरळमध्ये आजही अस्तित्वात असलेल्या या साम्यवादी विचारसरणीमुळे आधुनिक भारतातही सहस्रो हत्याकांडे घडली आहेत. ‘साम्यवादी’ आणि ‘इस्लाम विचारसरणी’ एकत्र आल्यास भारतीय जनतेवर किती भयंकर परिणाम होतील’, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

५. ‘इस्लामी तत्त्वज्ञान उदात्त जागतिक तत्त्वज्ञानाशी योग्यतापूर्ण राहू शकत नाही’, याची डॉ. आंबेडकर यांना असलेली जाण !

हिंदु राष्ट्र भारतात पूर्वीपासून होते. परकीय भारतात आले, तेव्हा त्यांनी हिंदु राष्ट्र, हिंदु लोक, हिंदु जनता इत्यादी असेच मानले; मात्र आधुनिक काळात हिंदु राष्ट्राविषयी बोलणारे केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. ‘पार्टिशन ऑफ इंडिया, थॉट्स ऑफ पाकिस्तान (भारताची फाळणी आणि पाकिस्तानचे विचार)’, या त्यांच्या पुस्तकात त्यांनी लोकसंख्येच्या देवाणघेवाणीविषयी लिहिले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारताची फाळणी मान्य नव्हती. त्यामुळे त्यांना ‘मुसलमानांनी भारत सोडून जावे’, असे वाटत नव्हते. डॉ. आंबेडकर अत्यंत व्यावहारिक होते. त्यांची दूरदृष्टी इतकी होती, ‘इस्लामी तत्त्वज्ञान उदात्त जागतिक तत्त्वज्ञानाशी योग्यतापूर्ण राहू शकत नाही’, हे त्यांना ठाऊक होते. ‘मुसलमानांचा जगाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पुष्कळ संकुचित असून त्यांचे विचार भयंकर आहेत. त्यामुळे ते हिंदूंसमवेत राहू शकत नाहीत’, असे डॉ. आंबेडकर यांना वाटत होते. त्यांनी हिंदु आणि मुसलमान समाज यांचा संपूर्ण तौलनिक अभ्यास केला. त्यानंतर ते या निष्कर्षापर्यंत पोचले, ‘भविष्यात हिंदूंना एक शांत आणि समृद्ध देश हवा असेल, तर त्यांच्या वाट्याला येणार्‍या भागातून त्यांनी सर्व मुसलमानांना जाऊ द्यावे. असे झाले, तरच ते ‘हिंदुस्थान’ होईल.’

६. ‘हिंदु आणि मुसलमान यांचे सहअस्तित्व देशासाठी विनाशकारी ठरेल’, असे भाकीत करणारे डॉ. आंबेडकर !

डॉ. आंबेडकर एक विचारवंत होते. त्यांनी जग आणि राजकीय परिस्थिती जाणली होती. त्यामुळे भारताच्या विभाजनाविषयी त्यांनी सांगितले होते, ‘मुसलमान इतके आक्रमक आहेत की, ते त्यांचा वाटा मिळवल्याविना सोडणार नाहीत. त्यामुळे देशाचे विभाजन होऊ दे. मुसलमानांना मिळालेल्या भागात एकही हिंदु असता कामा नये. सर्व हिंदू हिंदुस्थानात आणले जावेत. आपल्याला हिंदुस्थानात शांत आणि समृद्ध जीवन जगायचे असेल, तर सर्व मुसलमानांना पाकिस्तानात पाठवून द्यावे. हिंदुस्थानात एकही मुसलमान रहाता कामा नये.’ आज असे सांगण्याचे धाडस कुणामध्येही नाही.

डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकात शेवटी उपसंहार लिहिला आहे. पुस्तकातील युक्तीवादाचा मोठा भाग हिंदूंना उद्देशून आहे. ‘हिंदु आणि मुसलमान यांचे सहअस्तित्व देशासाठी विनाशकारी ठरेल’, असे दूरदृष्टीने सांगणारे डॉ. आंबेडकर एकमेव होते. ते काँग्रेसच्या नेत्यांचे कडवे टीकाकार होते. ते म्हणाले होते, ‘भारतात हिंदू बहुसंख्य आहेत आणि बहुसंख्यांकांचे विचार लक्षात घ्यायलाच हवे.’ त्या वेळी त्यांचे कुणीही ऐकले नाही. हे सर्व त्यांनी वर्ष १९४० मध्ये, म्हणजे फाळणी होण्याच्या ७ वर्षांपूर्वी लिहिले होते. त्या वेळी लोकांनी त्यांच्या म्हणण्याची नोंद घेतली असती, तर आता आपल्यावर ही वेळ आली नसती. ‘हिंदूंची बुद्धी इतकी कमकुवत आणि निस्तेज कशी झाली की, त्यांना ‘पुढील १० वर्षांत काय होईल ? हे पहाताही येत नाही’, असे म्हणत त्यांनी खेदही व्यक्त केला आहे. शेवटी त्यांनी असेही म्हटले आहे की, हिंदूंनी जर त्यांचे कर्तव्य केले नाही, तर ते नष्ट होतील.

७. केवळ ‘लोकसंख्या’ बनून राहिलेली आताची ‘लोकशाही’ !

जे हिंदू त्यांच्या सहकार्यांच्या भाग्याविषयी किंवा हिंदु-मुसलमान एकतेविषयी बोलत होते, ते कधी घडलेच नाही. उलट त्याची परिणती देशाच्या विभाजनात आणि त्यानंतरच्या भयानक स्थितीत झाली. सध्याची ‘लोकशाही’ ही ‘लोकसंख्या’ बनली आहे. आपण ‘आपल्या मुलांना भगवद्गीता शिकवली पाहिजे’, असे सर्वसाधारणपणे म्हणतो. अल्पसंख्यांक त्यांच्या मुलांना कुराण शिकवतात. त्या शिकवणीत प्रत्येक मुलाला हिंदूंना मारायला शिकवले जाते. आपल्याला हे ठाऊक नसल्याने आपण त्यांना सहजपणे भुलतो. वर्ष २०४७ पर्यंत ते इस्लामिक राज्य बनवण्याची योजना आखत आहेत. ते थांबवणे आपल्यासाठी मोठे आव्हान आहे.

८. हिंदूंना सद्यःस्थितीत मार्गदर्शक ठरणारे भगवद्गीतेतील काही श्लोक 

भगवद्गीतेमध्ये कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग, राजयोग, आसुरी धर्म, सात्त्विक धर्म इत्यादी सर्व आहे.

‘स्वधर्मे निधनं श्रेयः ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक ३५)
अर्थ : ‘स्वतःच्या धर्मात मरण आले, तरी ते श्रेष्ठ आहे.’ ‘कोणत्याही परिस्थितीत स्वधर्म सोडू नका’, हे शिकवणे आवश्यक आहे.

‘क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ।’
(श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ३)

अर्थ : ‘हे परंतपा (अर्जुना), अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा रहा.’ हे विधान किती सत्य आहे. आपल्याला कितीतरी दुःखद प्रसंगांना सामोरे जावे लागते; परंतु श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले हे ज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. अंतःकरणाचा दुबळेपणा सोडून दे आणि तुझे कर्तव्य करण्यास सिद्ध हो.

‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।’
अर्थ : सर्व प्राणीमात्र सुखी होवोत. सर्वांना चांगले आरोग्य लाभो.

या श्लोकातील ‘सर्व’ यात आतंकवादी, धर्मांध, धर्मप्रचारक, भारतद्वेषी, देशविरोधी या सर्वांचा समावेश आहे का ? निश्चितच नाही. चांगले आणि वाईट यांतील भेद करता येणे, याला ‘विवेक ज्ञान’ म्हणतात. आतंकवाद्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आपली ऊर्जा का खर्च करायची ? पुढील श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे.

सुमित्रा न आप ओषधयः सन्तु । दुर्मित्रास्तस्मै भूयासुः । योऽस्मान्द्वेष्टि । यं च वयं द्विष्मः ।।
– (तैत्तिरीय आरण्यक, प्रपाठक ४, अनुवाक् ११)

अर्थ : पवित्र जल आणि औषधे आमचे चांगले मित्र होवोत. जे आमचा द्वेष करतात आणि आम्ही ज्यांचा द्वेष करतो, त्यांचे ते शत्रू होवोत.

सनातन धर्माविषयी एका वाक्यात सांगणारा रामायणातील हा पुढील श्लोक आहे,

‘कृते च प्रतिकर्तव्यम् एष धर्मः सनातनः ।’
अर्थ : ‘उपकाराची परतफेड करणे, हा आपला प्राचीन धर्म आहे.’ जी व्यक्ती तुमचे हित करते, तिचे उपकार तुम्ही अवश्य फेडा; परंतु जी तुम्हाला मारते, तुमच्या जिवावर उठली आहे, तिचे कदापि उपकार फेडू नका.’

– डॉ. एस्.आर्. लीला (भाजपच्या माजी आमदार आणि लेखिका), बेंगळुरू, कर्नाटक.