सातत्याने राष्ट्रघातकी विधाने करणारे अभिनेते नसरुद्दीन शाह यांचे फुकाचे विधान
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोल टोपी (मुसलमान घालत असलेली टोपी) घातलेले पहायचे आहे, असे विधान अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी केले. ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी वरील वक्तव्य केले. ‘देशाच्या इतिहासात प्रथमच मुसलमान समुदायाचा एकही प्रतिनिधी दिसत नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये एकही मुसलमान, ख्रिस्ती, शीख खासदार नाही; पण सरकारमध्ये मोदी यांनी १ शीख आणि १ ख्रिस्ती मंत्री नियुक्त केले आहेत. या स्थितीविषयी तुमचे काय मत आहे ?’, असा प्रश्न करण थापर यांनी शाह यांना विचारला. त्या वेळी त्यांनी वरील उत्तर दिले.
शाह पुढे म्हणाले की,
१. मोदी यांनी मागे एका कार्यक्रमात गोल टोपी घालण्यास नकार दिला होता. ती घटना विसरणे अवघड आहे. त्यांनी जर गोल टोपी घातली, तर त्यातून, ‘मी मुसलमानांपेक्षा वेगळा नाही. आपण दोघे या देशाचे नागरिक आहोत’, हा संदेश ते देऊ शकतील. (भारतातील बहुतांश मुसलमान हे पाकप्रेमी आहेत. बर्याच घटनांतून त्यांना आलेला पाकप्रेमाचा उमाळा भारतियांनी पाहिला आहे. त्यामुळे मुसलमानांना ते भारतीय असल्याची जाणीव आहे का ?’, हे प्रथम शाह यांनी सांगावे ! – संपादक) जर त्यांना या देशातील मुसलमानांना आपलेसे करायचे असेल, तर या कृतीचा त्यांना लाभ होऊ शकेल.
२. भाजपमधील मुसलमानद्वेष त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर गेला आहे. हे निराशाजनक आहे. त्याच्यामध्ये मुसलमानांविषयी असणारा द्वेष पुष्कळ खोलवर मुरला आहे.
३. मोदी यांचा अहंकार फार मोठा आहे. ‘त्यांनी त्यांच्या विधानांवर नियंत्रण ठेवावे’, अशी अपेक्षा करणे धाडसाचे ठरेल. त्यामुळे ते चुकले आहेत ?, हे त्यांना कधीच मान्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी गोली टोपी घातली, तर ते एक चांगला संदेश देऊ शकतील.
मुसलमानांना दिला सल्ला !
भाजप करत असलेल्या मुसलमानांच्या द्वेषाविषयी शाह म्हणाले की, मुसलमानांनी द्वेषाला द्वेषाने उत्तर देऊ नये. राहुल गांधी यांनी ज्या प्रमाणे ‘नफरत के बाजार में मुहोब्बत की दुकान’, असे सांगत प्रयत्न केले, तसे मुसलमानांनी प्रयत्न करायला हवेत. (भारतातील बहुतांश मुसलमान हे धर्मांध असल्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षा करणे हास्यास्पद आहे ! – संपादक) भाजपच्या नेत्यांच्या कोणत्याही विधानाचे वाईट वाटून न घेता त्या पलीकडे पहाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
संपादकीय भूमिका
|