New Indian Army Chief : लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी नवे सैन्यदल प्रमुख !

नवी देहली – केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची सैन्यदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ते ३० जून या दिवशी पदभार स्वीकारतील. या दिवशी विद्यमान सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे निवृत्त होणार आहेत.

द्विवेदी सध्या सैन्यदलाचे उपप्रमुख असून चीनसमवेत सीमेवरून चालू असलेल्या चर्चेत त्यांचा सक्रीय सहभाग आहे.