Hunter Biden Convicted : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा बंदुकीच्या प्रकरणी दोषी !

  • २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता !

  • बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज करतांना अमली पदार्थांच्या व्यसनाची माहिती लपवल्याचा आरोप !

हंटर बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर याला न्यायालयाने एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्याला या प्रकरणी २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. ३ मासांनंतर न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. अमेरिकेत विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या मुलाला न्यायालयाने दोषी ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. हंटर याच्यावर बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज करतांना त्याच्या अमली पदार्थांच्या व्यसनाची माहिती लपवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ४ दिवसांपूर्वी बायडेन म्हणाले होते की, जर हंटर बंदुकीच्या संदर्भातील खटल्यात दोषी आढळला, तर त्याला कधीही क्षमा करणार नाही.

अमेरिकेत राष्ट्राध्यपदाची निवडणूक येत्या काही मासांत होणार आहे. त्यापूर्वीच हंटर याला शिक्षा होऊ शकते. यामुळे बायडेन यांना निवडणुकीत तोटा होऊ शकतो.

संपादकीय भूमिका

भारतात असे कधीतरी घडू शकते का ? राजकीय दबावामुळे नेत्यांच्या नातेवाइकांना कधी शिक्षा होत नाही किंवा झाली, तरी त्यातून पळवाटा शोधल्या जातात !