Israel Hamas War : गाझा युद्धात जितके अधिक पॅलेस्टिनी नागरिक मरतील, तितका हमासला अधिक लाभ होईल ! – हमासचा प्रमुख सिनवार

हमासचा प्रमुख सिनवार याचे विधान !

हमासचा प्रमुख याह्या सिनवार

तेल अविव (इस्रायल) – हमासला इस्रायल समवेतचे युद्ध थांबवायचे नाही, असे हमासचा प्रमुख याह्या सिनवार याने म्हटले आहे. अमेरिकी वृत्तपत्र ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मधील वृत्तानुसार, सिनवार याने हमासच्या सैनिकांना आणि युद्धविरामासाठी मध्यस्थांच्या संपर्कात असलेल्या अधिकार्‍यांना सांगितले आहे की, पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठीच्या युद्धात गाझातील नागरिकांचा मृत्यू होणे आवश्यक आहे. युद्धात जितके अधिक नागरिक मरतील, तितका हमासला अधिक लाभ होईल.

यापूर्वी हवाई आक्रमणात हमासचे राजकीय नेते इस्माईल हनीये याची ३ मुले आणि ४ नातवंडे यांचा मृत्यू झाल्यावर सिनवार म्हणाला होता की, लोकांच्या या ‘बलीदाना’मुळे पॅलेस्टाईनला नवसंजीवनी मिळेल. यामुळे देश विकासाच्या दिशेने पुढे जाईल.

संपादकीय भूमिका

स्वतःच्या मृत मुसलमान बांधवांच्या टाळूवरील लोणी खाणारे जिहादी आतंकवादी संघटनांचे नेते !