उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. गौरी कौरासे ही या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२४ मध्ये चि. गौरी गणेश कौरासे हिची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के आहे.’ – संकलक)
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
चि. गौरी कौरासे हिची तिची आजी (आईची आई) सौ. मंगला दर्वे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. नम्रता
‘चि. गौरी मोठ्या व्यक्तींशी हळुवारपणे आणि नम्रतेने बोलते.
२. ऐकण्याची वृत्ती
तिच्या आईने ‘एखादी गोष्ट वाईट आहे, ती करू नये’, असे सांगितल्यावर ती लगेच ऐकते आणि ती गोष्ट करत नाही.
३. स्वावलंबी
गौरी तिला जमेल, तेवढी स्वतःची कामे स्वतःच करते, उदा. शाळेत जातांना डबा आणि पाण्याची बाटली दप्तरात ठेवणे, शाळेतून आल्यावर बूट-मोजे काढून जागेवर ठेवणे, दप्तर जागेवर ठेवणे इत्यादी.
४. प्रेमभाव
गौरीला कुणी खाऊ दिला, तर ती कधी एकटी खाऊ खात नाही. ती तो खाऊ घरी घेऊन येऊन तिची चुलत बहीण आणि भाऊ यांनाही देते.
५. अहं अल्प असणे
गौरीने आईचे काही ऐकले नाही, तर आई तिच्यावर रागावते. तेव्हा ती आईची क्षमा मागते.
६. देवाची आवड
गौरी आमच्याकडे असतांना सकाळी उठून अंघोळ झाल्यावर प्रतिदिन देवासमोर डोके टेकवून नमस्कार करते आणि मोठ्या व्यक्तींच्या पायांना हात लावून नमस्कार करते. ती श्रीकृष्णाचा पाळणा म्हणते. तिला देवाची गाणी म्हणायला आवडते. बाहेर जातांना मार्गावर मंदिर दिसल्यावर ती नमस्कार करते.
७. स्वभावदोष
हट्ट करणे, इतरांमध्ये लवकर न मिसळणे’
– सौ. मंगला दर्वे (चि. गौरीची आजी (आईची आई), आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ५८ वर्षे), चंद्रपूर. (एप्रिल २०२४)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.