हरिदास कसा असावा ?

‘हरिदासात वक्तृत्व हवे; पण वावदुकी नको, गाणे हवे; पण वस्ताद गवया इतके नको. कथेत गायन-वादनाची जोड, म्हणजे मेजवानीच्या वेळी उदबत्त्या लावण्याप्रमाणेच आहे. अभिनय हवा; पण नटाइतका नको. विनोद असावा; पण विदुषकी नसावा. उपमा, दृष्टांत आणि गोष्टी या चटकदार असाव्यात; पण अतिशयोक्तीच्या नसाव्यात. कोटीत विनोद आणि विद्वता पाहिजे; पण घडघड पाठांतर नको. आचारांची श्रेष्ठता असावी; पण व्युत्पत्ती प्रियता नसावी… श्रोत्यांच्या कल्पनाशक्तीला थोडी तरी जागा ठेवावी, असे न केले, तर कीर्तनाचे कीर्तनत्व जाते !

– श्री. दा.ह. टिळक
(साभार : दैनिक ‘केसरी’, १८.१२.१९२८)